Home नाशिक एमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया

एमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0029.jpg

एमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ३० एप्रिलला होणार आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. तर गट ब सेवा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती • सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे

• महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे

• वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे

• गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे

• महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी – १ ) / मुद्रांक निरीक्षक –

४९ पदे

• गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ६ पदे

• वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद

• वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे

• मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे
आतापर्यंत दोन हजार पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात एमपीएससीने प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदाच आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याशिवाय देशाच्या प्रशासकीय इतिहासातही एवढ्या पदांची भरती लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाणे दुर्मीळ आहे. एकाच अर्जाद्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत आहे.

Previous articleयुवा मराठा विशेष रात्रीचा गोंधळ बराच होता!ग्रामसेवकांची हमरीतुमरी(सांगण नही पन सांगण वन)
Next articleगोळीबार करणारा नगरसेवक पुत्र ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here