Home नांदेड स्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले.

स्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले.

231

राजेंद्र पाटील राऊत

स्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आ.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतुन देगलुर बिलोली मतदारसंघातील गंभीर रुग्णांना देगलुर बिलोली तसेच नांदेङ या ठिकाणी नेण्यासाठी आमदार निधीतून 5 रुग्णवाहिका मंजुर केल्या होत्या. आज त्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण आमदार अमरभाऊ राजूरकर व भावी आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम साहेब, तहसीलदार विनोद गुंडमवार साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ आकाश देशमुख, शिक्षण सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक,नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, काँग्रेस शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रितम देशमुख हणेगावकर,माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, बांधकाम सभापती अनिल अण्णा बोन्लावार, नगरसेवक बालाजी टेकाळे,शैलेश उल्लेवार, दीपक शहाणे, जि प सदस्य बंदखडके, कृषी उ बा सभापती गिरिधर पाटील, उपसभापती बालाजी पा थडके, काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार, काँग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर, डॉ धुमाळे, आदी उपस्थित होते,
या रुग्णवाहिका देगलुर बिलोली तालुक्यातील मरखेल, हणेगाव ,शहापुर ,सगरोळी,लोहगाव बिलोली तालुक्यातील सगरोळी, लोहगाव,या ठिकाणी असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय जलदगतीने हा निर्णय स्व.आ.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी घेतला होता.या निर्णयाचे समाजमनातून स्वागत होत आहे. गरजू रुग्णांना प्राण वाचवण्यासाठी आवश्यक त्या सेवा वेळेत मिळण्यासाठी या सुविधेचा खूप फायदा होणार आहे.

Previous article“जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो – अदर पुनावालां
Next articleमहाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत विद्यार्थी विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रविण श्रिरामे यांची निवड…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.