Home कोरोना ब्रेकिंग “जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो – अदर पुनावालां

“जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो – अदर पुनावालां

215
0

राजेंद्र पाटील राऊत

“जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो – अदर पुनावालां

राजेश एन भांगे

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.
अशातच देशभरात अनेक ठिकाणी करोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासू लागला आहे.
जुलै महिन्यापर्यंत लसींची कमतरता भासू शकते असं सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.
फायनान्शियल टाईम्सच्या एका अहवाला नुसार,
अदर पुनावाला म्हणाले की, जुलै महिन्यापर्यंत लसींचं उत्पादन ६० ते ७० मिलियनपासून १०० मिलियनपर्यंत वाढू शकतं.

सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरु केली आहे.
अशावेळी हा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पुनावाला म्हणाले की जानेवारी मध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यावर त्यात पुन्हा वाढ होऊन करोनाची दुसरी लाट येईल असं वाटलं नव्हतं.
सगळ्यांनाच वाटत होतं की भारताने या महामारीवर मात करायला सुरुवात केली आहे,
असंही ते म्हणाले.

अदर पुनावाला यांनी व्यक्त केली भीती भारता मध्ये ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे ?

यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असं म्हटलं आहे.
काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल या संदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली.

Previous articleकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय लॉकडाउन’चा विचार करावा – मे.सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला सल्ला
Next articleस्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here