Home Breaking News सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे दिनांक 25 जुलै रोजी महाड पूरग्रस्त गावांमध्ये घरोघरी...

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे दिनांक 25 जुलै रोजी महाड पूरग्रस्त गावांमध्ये घरोघरी जाऊन मदतकार्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

186
0

प्रतिनिधी. अरुण कुंभार
रायगड जिल्हा ब्यूरो चीफ ए बी एन मीडिया न्युज नेटवर्क
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे दिनांक 25 जुलै रोजी महाड पूरग्रस्त गावांमध्ये घरोघरी जाऊन मदतकार्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी संकटकाळी कायम आपण मदत करणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य…
हाच उद्देश मनात ठेवून पावसामुळे आलेल्या महापूर आपत्तीमध्ये अडकलेल्या संकटात सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील भोराव, आकले, कानगुळे, सवाद या गावातील ५०० हुन अधिक अतिशय गरजू कुटूंबाना सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून अत्यावश्यक साहित्य, किराणा, ब्लॅंकेट, कपडे इत्यादी मदत करण्यात आली. यासाठी अलिबाग, पेण, पनवेल, डोंबिवली, मुंबई विभागाचे दुर्गसेवक अनमोल योगदान लाभले. या कर्तव्यपूर्ती कार्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक जिवलग सहकाऱ्यांच्या सदैव ऋणात…
अजूनही पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, सातारा जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण याठिकाणी मदतकार्य सुरूच आहे…
आपल्या बांधवांसाठी आपणच उभं राहून आधार देणं हे आपलं #आद्यकर्तव्य.

Previous articleसर्व्हेक्षण व पुनर्वसन करून धोकादायक डोंगरावरील गावचा अभ्यास तज्ञ समितीने करावा. तळये दरड दुर्घटनास्थळी रामदास आठवलेंनी दिली भेट
Next article🛑 वादळाचा तडाखा ,जालन्यातील विठ्ठलाची ५१ फुटी मूर्ती कोसळली 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here