Home नाशिक गोळीबार करणारा नगरसेवक पुत्र ताब्यात

गोळीबार करणारा नगरसेवक पुत्र ताब्यात

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0031.jpg

गोळीबार करणारा नगरसेवक पुत्र ताब्यात
भास्कर देवरे (युवा मराठा न्युज)
मागील वर्षी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या खर्चाचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पिस्तूल काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणारा माजी नगरसेवकपुत्र स्वप्नील सूर्यकांत लवटे (वय ३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की देवळाली गाव सार्वजनिक पार येथे काल सायंकाळी शिंदे गटाने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक सर्वपक्षीय समितीची असल्याचे निदर्शनास आले असता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत शिंदे गटाबरोबर आम्ही जयंती साजरी करणार नाही, त्यामुळे सर्वपक्षीय हा आशय काढून टाकावा, अशी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये वादविवाद व शिवीगाळ झाले. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने बंदुकीतून हवेत गोळीबार केला.
गोळीबार होताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धावपळ होऊन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने देवळाली गावातील दुकाने पटापट बंद झाली. ही माहिती पोलिसांना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
कानोकानी गोळीबार घटनेची माहिती मिळाल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ती कमी होत नसल्याने पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी माजी नगरसेवकपुत्र स्वप्नील लवटे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Previous articleएमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया
Next articleसटाणा – ताहाराबाद रोडच्या समस्येबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here