Home नाशिक सटाणा – ताहाराबाद रोडच्या समस्येबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

सटाणा – ताहाराबाद रोडच्या समस्येबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0038.jpg

सटाणा – ताहाराबाद रोडच्या समस्येबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

भास्कर देवरे (युवा मराठा नेटवर्क)

विंचुर प्रकाशा महामार्ग ७ चे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करुन नविन रस्ता काँक्रिटीकरणाचे काम शासनाच्या वतीने चालु करण्यात आले आहे परंतु काम घेतलेल्या ठेकेदाराकडून काम करतांना दिरंगाई केली जात आहे. ठेकेदाराला संबंधित विभागाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत, गेल्या तीन वर्षापासुन काम चालु आहे परंतु अजूनही काम पूर्ण होत नाही. राष्ट्रीय महामार्गात रूपांतरण झाल्यानंतर सदर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. सध्या वनोली ते सटाणा दरम्यान सदर रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रेटीकरण करण्याचे काम चालु असुन काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. मागील १५ ते २० दिवसापासून काम पूर्ण बंद आहे. रस्ता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदुन ठेवलेला असल्यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नसल्यामुळे रोज छोटे मोठे अपघात होत असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेली खडी व दगड गोटे वाहनाच्या वेगामुळे त्या हवेत जम्प घेतात व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोकांना दुखापती होत आहेत.
शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांवर मोठ्याप्रमाणावर धुळीचा संचय होत असुन परिणामी पिकाच्या वाढीस बाधा निर्माण होत असुन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही नागरिकांनी सदर समस्येबाबत बागलाण तालुक्यातील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले असता “सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला असून त्याचे काम आमच्या अधिकारात नाही अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळतात. तसेच संबधित कंत्राटदारास रस्त्यावर पाणी टाकण्यास सांगितले असता त्यांच्याकडून पाणी टाकण्याचे काम होत नाही. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस संबधित कंत्राटदार व प्रशासन जबाबदार असून येत्या दोन दिवसात रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे. तसेच वनोली ते औंदाणे रस्त्याच्या कामाची पाहणी करून नागरिकांची व्यथा जाणून घ्यावी व शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना न्याय द्यावा.
२५ जानेवारी २०२३ पर्यंत योग्य निर्णय न झाल्यास दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी कोणतीही पूर्वसुचना न देता रस्ता वाहतुकीसाठी १००% बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी माहिती या निवेदनाद्वारे सादर करीत तसेच पुढील होणाऱ्या गैरसोयीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी तरसाळीचे मा. सरपंच लखन पवार, वनोलीचे सरपंच शरद भामरे,औंदाणेचे सरपंच भरत पवार, साईसावली फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, तरसाळी उपसरपंच नामदेव बोरसे, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदळ, तुषार रौंदळ, गणेश निकम, मयुर निकम, गौतम वानखेडे, दत्तु वाघ, गणेश रौंदळ, कोमल निकम, सनि निकम, शाम पवार, आदिसह परीसरातील नागरिक उपस्थित होते..

Previous articleगोळीबार करणारा नगरसेवक पुत्र ताब्यात
Next articleएकता शारदा महिला मंडळ गणेश नगर गडचिरोली येथे हळदी कुंकु व विविध कार्यक्रमांचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here