Home नांदेड बाऱ्हाळी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

बाऱ्हाळी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

105

आशाताई बच्छाव

IMG_20240220_105743.jpg

बाऱ्हाळी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन
मुखेड बाराहाळी -दि. १८ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिणपीठ नाणीज यांच्या प्रणेने श्री सांप्रदाय सेवा समिती बाऱ्हाळीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील रक्तदात्यांनी सर्वश्रेष्ठ असलेले रक्तदान करून सामाजिक व धार्मिक उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री संप्रदाय सेवा समिती बाऱ्हाळीया वतीने करण्यात आले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिणपीठ नाणीजच्या प्रेरणेने दरवर्षी अनेक राज्यात शिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने दि. १० ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बाऱ्हाळी ता. मुखेड येथे सकाळी १० ते सायं. ५ वाजताच्या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून श्रीमती विजयाताई देशपांडे, ॲड. मुरारजी देशपांडे, मल्हारराव देशपांडे, राजन देशपांडे, चंद्रशेखर देशमुख, अरुण महाजन, नि. म. वडगावकर, स्वप्नील चव्हाण, बालाजी पाटील सकनुर, हणमंत मामा वाडीकर, सपोनी भालचंद्र तिडके, सतिश महाजन, डॉ. आकाश देशमुख, व्यंकट पाटील उमाटे, डॉ. योगेश दाचावार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी परिसरातील रक्तदात्यांनी या धार्मिक व सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री सांप्रदाय समिती बाऱ्हाळीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा
Next articleदेगलूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.