Home नांदेड देगलूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

देगलूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_110036.jpg

देगलूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

भव्य ‘पाळणा’ सोहळा उत्साहात पार..

मनोज बिरादार
युवा मराठा न्यूज
विभागीय संपादक

नांदेड (देगलूर);दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी देगलूर शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याची देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर व माजी आमदार सुभाषरावजी साबणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना व पाळणा गीत गायले.
देगलूर शहर व तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्थांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरात शिव प्रेमींकडून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…… छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.
विविध सामाजिक, राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते पदाधिकारी त्यानंतर देगलूर शहरातील सर्व कार्यालयातील अधिकारी तसेच पोलीस अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले . देगलूर शहरात जयंती निमित्त सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध संस्थांत आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे शहराला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते. त्यावेळी देगलूर शहरातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते त्यानंतर देगलूर शहरातील व तालुक्यातील शिवप्रेमी हजारोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभायात्रेत सहभाग घेतला.

Previous articleबाऱ्हाळी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleजया एकादशी च्या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here