Home सामाजिक जया एकादशी च्या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते

जया एकादशी च्या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते

152
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_155534.jpg

जया एकादशी च्या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते

‘देव भावाचा भुकेला’ असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला, की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही. दर महिन्यात दोन एकादशी येतात. अशा रितीने वर्षभरात २४ एकादशी येतात. अधिक मासात आणखी दोन एकादशींची भर पडते आणि वर्षभरात २६ एकादशी होतात. माघ मासात षटतिला आणि जया एकादशी येते. आज जया एकादशी. तिलाच भिष्म एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी केली असता चार लाभ होतात.या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने यधिष्ठिराला समजावले होते. एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणार्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे.ही एकादशी जया एकादशी या नावे ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. असे म्हटले जाते, की या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते.जया एकादशीच्या दिवशी रवियोग आणि त्रिपुष्कर योग एकत्र येत असल्यामुळे या तिथीचे महत्त्व वाढले आहे. जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धन संपत्तीत वाढ होते व आपल्या दैनंदिन कार्यात यश प्राप्त होते. हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे विंâवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते.

सौ जयाताई निचीत
निफाड तालुका महिला वारकरी मंच सोनेवाडी

Previous articleदेगलूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Next articleनाशिकच्या कामटवाडा येथे शिवजयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here