• Home
  • येवती येथील बि.एस.एन.एल. टॉवरच्या २२ बॅटऱ्या चोरणारे २ चोरटे मुखेड पोलीसांच्या ताब्यात

येवती येथील बि.एस.एन.एल. टॉवरच्या २२ बॅटऱ्या चोरणारे २ चोरटे मुखेड पोलीसांच्या ताब्यात

येवती येथील बि.एस.एन.एल. टॉवरच्या २२ बॅटऱ्या चोरणारे २ चोरटे मुखेड पोलीसांच्या ताब्यात

एक लाख पंधरा हजार पाचशे रूपये किंमतीच्या २२ बॅटऱ्या मुखेड पोलीसांनी मुद्देमालासह केल्या जप्त.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे येवती येथे दि.२७ फेब्रूवारी २०२१ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास आरोपी शिवाजी गंगाराम रासुरे,माधव हणमंत राउलवाड हे दोघे तालुक्यातील येवती येथील बी.एस.एन.एल.टॉवर चालवण्यासाठी असलेल्या १२ बॅटऱ्या चोरून नेत असताना येवती येथील सतर्क नागरीक संजय विजय कुमार पाटील, राजु पुंडलिक फिरंगवाड , शंकर माधवराव मरखेले यांनी घटनास्थळी तथा जायमोक्यावर त्या चोरांना पोलिस स्टेशन मुखेड यांच्या ताब्यात देण्यात आले होते. येवती येथील बी.एस.एन.एल टॉवरचे कनिष्ठ अभियंता सुरेंद्र गंगाधरराव यन्नावार, यांनी मुखेड पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध दिलेल्या एकूण १,२६,००० रुपये किंमतीच्या २४ बॅटऱ्या चोरून नेले बाबद च्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात अपराध क्र .६५/२०२१ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा प्रमाणे ब तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी यापूर्वी मुक्रमाबाद येथे चोरी केलेल्या ६ बॅटऱ्या मावशीच्या घरून आणि ४ बॅटऱ्या किलबील नगर मुखेड येथे एका शौचालयाच्या शोष खड्यात अरोपीनी चोरून ठेवलेल्या अशा एकुण १,१५,५०० रूपयये किंमतीच्या २२ बॅटऱ्या मुखेड पोलीसांनी मुद्देमाल जप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आले. सदरील कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे,उप विभाग देगलुर यांच्या मार्गदर्शना खाली मुखेड पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक बी.एस.मगरे,सपोनि संतोष केंद्रे, डि.एस.बी खात्यातील पांडूरंगराव पाळेकर पोलिस अमलदार डी.एम.धोंडगे,किरणकुमार वाघमारे,शिवाजीराव अडबे, गंगाधरराव चिंचोरे,भास्कर मुंडे , रमेश जोगपेठे यांनी महत्वपुर्ण कामगीरी बजावली.

anews Banner

Leave A Comment