Home Breaking News 🛑 कारूळ गाव भोईवाडी गावची पाणी समस्या दूर करण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...

🛑 कारूळ गाव भोईवाडी गावची पाणी समस्या दूर करण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून जमविला निधी 🛑

95
0

🛑 कारूळ गाव भोईवाडी गावची पाणी समस्या दूर करण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून जमविला निधी 🛑
✍️ गुहागर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

गुहागर:-⭕ मानसरोवर येथे मौजे कारूळ भोईवाडी ता.गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथील युवा समितीच्या वतीने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा अखिल दाभोळखाडी भोई समाज अंतर्गत खेळवण्यात आली होती या स्पर्धेत अखिल दाभोळ खाडी भोई समाजातील एकूण १६ संघानी सहभाग घेतला होता. आणि या स्पर्धच उद्घाटन जयदादा युवा मंच कामोठे अध्यक्ष आणि बी.जे.पी तरुण युवा कार्यकर्ता श्री.जयकुमार शिवराज दिगोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या स्पर्धचे मूळ उद्धिष्ट कारूळ गाव भोईवाडी ग्रामीण ठिकाणी होत असलेली पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी गावात स्वतंत्र बोरवेल पाडून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हा आहे.
या बोरवेल करीता लागणारी जागा ही कारूळ गावचे आधारस्तंभ आणि अखिल दाभोळखाडी भोई समाजाचे जनल सेक्रेटरी श्री. शांतारामजी जाधवयांनी देण्याच जाहीर केले आहे.गावी पडण्यात येण्यार बोरवेलचा खर्च हा खूप मोठ्या रक्कमेचा आहे हे लक्षात घेऊन गावच्या विकासा साठी कारूळ गाव युवा समितीने यामध्ये मोठा पुढाकार घेऊन गावाच्या बोरवेल करता निधी संकलनासाठी क्रिकेट स्पर्धांच आयोजन करून त्या स्पर्धांच्या माध्यमातून मिळणारा निधी हा गावाच्या बोरवेलं करता देण्याचा निर्धार कारूळ गाव युवा समितीने केला आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कारूळ गाव युवा समितीला अनेक देणगीदारांनी सढळहस्ते देणगी दिल्याने या उक्रमात युवासमितीला ( रोख रुपये चाळीस हजार ) इतका नफा मिळाला आहे.

आणि तो नफा युवा समतीचे *अध्यक्ष श्री.दिनेशजी सैतवडेकर सचिव श्री. सुनीलजी धुमाळ* हे हा निधी कारूळ गाव मुबई विभाग *अध्यक्ष श्री. रमेशजी सैतवडेकर* त्याच बरोबर कारूळ गाव मुंबई विभाग *सचिव श्री.विश्वानाथजी जाधव* यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत.

या स्पर्धला अखिल दाभोळ खाडी भोई समाजातील काही मान्यवर मंडळी उपस्थिती होती श्री.आर.आर.जाधव, अध्यक्ष अखिल दाभोळ खाडी भोई समाज, श्री. शातारामजी जाधव – सचिव अखिल दाभोळ खाडी भोई समाज ,श्री .दीपक जाधव- अध्यक्ष कारूळ सात गाव मुंबई विभाग,श्री.रमेश लवंदे-सचिव कारुळ सातगाव मुंबई विभाग,श्री. एकनाथ जाधव-सचिव क्षैक्षणिक, संस्कृती क्रीडा समिती,श्री.दिपक पारधी ,श्री विजय दिवेकर-समाज कार्यकारणी सदस्य,त्याच बरोबर श्री.भरत पवार इत्यादी मान्यवर उपस्थित राहून तरुणांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि ही स्पर्धा अतिष शिस्तबद आणि सर्व नियमांच काटेकोर पालन करून अतिशय उस्ताही वातावर्णात पार पडली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या स्पर्धेतील सर्व सहभागी संघ,सर्व देणगीदार , समाजबांधव व इतर सहकार्य करणरे मान्यवर यांचे कारुळ गावातील युवा समिती व गाव कार्यकरीणीच्या वतीने मनपुर्वक आभार मानण्यात येत आहेत.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here