Home Breaking News मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….

मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….

100
0

मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी ते मुखेड जाणाऱ्या मुख्य
रस्त्यावर ठिक ठिकानी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकास अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी असंख्य खडे पडल्याने रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे मुखेड तालुका असल्यामुळे कामानिमित्त तालुक्यांच्या ठिकाणी मुखेड येथे जात असतात सदरील रस्त्यावरून मोटरसायकलने जात असताना तारेवरची कसरत करत जावे लागते एक खड्डा चुकवून पुढे गेले की दुसऱ्या दुसऱ्या खड्ड्यातून गाडी अडकते. रस्त्यात खड्डा आहे कि खड्ड्यात रस्ता आहे हेच समजेनासे झाले आहे. यातच दररोज छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक किरकोळ जखमी होत आहेत . यास जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून बोलली जात आहे वयोवृद्ध माणसांना प्रवास करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.अशा होणाऱ्या अपघाताला आळा बसवण्यासाठी रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे आवश्यक आहे तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी संतप्त नागरिकातून केली जात आहे..

Previous articleयेवती येथील बि.एस.एन.एल. टॉवरच्या २२ बॅटऱ्या चोरणारे २ चोरटे मुखेड पोलीसांच्या ताब्यात
Next articleनाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड सरकारी यंत्रणा हादरली!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here