Home नाशिक दमदार पावसाच्या आगमनानंतर मेंढपाळाचे मुळ गावाकडे मार्गस्थ

दमदार पावसाच्या आगमनानंतर मेंढपाळाचे मुळ गावाकडे मार्गस्थ

147
0

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0011.jpg

दमदार पावसाच्या आगमनानंतर मेंढपाळाचे मुळ गावाकडे मार्गस्थ

पिंगळवाडे,,संदिप गांगुडेॅ युवा मराठा न्युज
दमदार पावसाच्या आगमनाने मेंढपाळा आपल्या मुळ गावाची ओढ लागल्याने केरसाणे मुंगसे पिंगळवाडे करंजाड, ताहाराबाद मार्गाने साक्री निजामपूर,कडे मार्गक्रम होत असून रस्त्याचे कडेला व मिळेल तेथे मेंढ्या चारत मेंढपाळाचे कळप जात असून गेले आठ महिने नाशिक सिन्नर या भागात मेंढ्या चारणीसाठी जातात आता दमदार पावसामुळे आपल्या मुळ गावाकडे चारा उपलब्ध झाल्याने गावाकडे धाव घेत आहे महामार्गावर मेंढरांचे कळप गावाकडे मार्गस्थ होत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यांच्यासोबत मेंढपाळही आपला कुटुंबकबिला घोड्यांच्या पाठीवर लादून हातात काठी घेऊन मेेंढरांना आवाज देत मार्ग क्रमण करु लागले आहेत. पावसाळ्यात घाटमाथ्यावर चार महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. साधारण दिवाळी दरम्यान या मेंढपाळांचे दख्खन भागात दरवर्षी जातात पावसाळ्यात विविध प्रकारची काटेरी वनस्पती निर्माण होत असते.यामुळे त्यांच्या चार्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागत असतो. नाशिक भागात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे असा असतो.जिथे मेंढरे बसतात त्या शेतातच मेंढपाळ आपला संसार थाटून वास्तव्य करुन असतो. ऑक्टोबर-नोव्हेंबर ते मे -जून दरम्यान त्यांचा सारा प्रपंच उघड्यावरच असतो. मेंढ्यांच्या चार्‍यासाठी मेंढपाळ सुमारे २५० ते३०० किलोमीटर भटकंती करतात. दरम्यान, यावेळी मोसमी पाऊस पडू लागल्याचे चिन्हे निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढयांचा कळप घेऊन आपल्या घरी परतीची वाट धरू लागले आहेत. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो.यंदा मात्र ते पावसाच्या आगमनानंतर जात आहे.

या गावाकडे आजही मेंढ्यांची संख्या जास्त,,साक्री तालुका,,छेडवेल पाखरुन, निजामपूर,कोठरे,दहिवेल,चिंचखेड. बागलाण तालुका,,कोटबेल,ढोलबारे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here