Home नांदेड मराठा सेवा संघ प्रणित प्रबोधन कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवश्री संभाजी नवघरे

मराठा सेवा संघ प्रणित प्रबोधन कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवश्री संभाजी नवघरे

65
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0016.jpg

मराठा सेवा संघ प्रणित प्रबोधन कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवश्री संभाजी नवघरे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे महाअधिवेशन नवी दिल्ली येथे नुकतेच पार पडले या कार्यक्रमामध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब महाराष्ट्र विधानसभेच्या माजी आमदार शिवमती रेखाताई खेडेकर राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेशजी टिकेत साहेब दैनिक देशोन्नतीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शिवश्री प्रकाशजी पोहरे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब राष्ट्रीय सचिव शिवश्री प्रदीप पाटील साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवश्री कमलेश पाटील साहेब दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट अविनाशजी काकडे, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील यांच्यासह सर्व कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष व विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या व निवडक पदाधिकाऱ्यांच्या या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवश्री संभाजी नवघरे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार व शेतकरी किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेशजी टीकेत साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली. यापूर्वी शिवश्री संभाजी नवघरे यांनी मराठा सेवा संघाच्या लातूर जिल्हा सचिव ,प्रदेश प्रशिक्षक व मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक आदी पदांवरील जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब ,माजी आमदार श्रीमती रेखाताई खेडेकर ,राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब,राष्ट्रीय सचिव शिवश्री प्रदीपजी पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील, कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री सोपानराव शिरसागर ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनीयर शिवश्री शिवाजी राजे पाटील, शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री प्रा.नामदेवराव दळवी, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here