राजेंद्र पाटील राऊत
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंबियांना आ.डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते १ लाखांचा धनादेश सुपूर्द …
▶️दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील मयत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीना सानुग्रह अर्थसाह्य म्हणून प्रत्येकी २० हजार रूपयाचा धनादेश देण्यात आला…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कंधार येथे आज तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै.हरीबा वलसंगे रा.मोहिजा ता.कंधार यांच्या परिवारास १ लाख रूपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश मुखेड/कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला व तसेच तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मयत व्यक्तींच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तीला सानुग्रह अर्थसाह्य म्हणुण प्रत्येकी २० हजार रूपयांंचा अनुदानाचा धनादेश आ.डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते खालील लाभार्थ्यांना सुपुर्द करण्यात आला.1) शाहूबाई ज्ञानोबा केंद्रे 2)सुशील संभाजी श्रीमंगले 3) सुरेखा माधव धर्मेंकर 4) सुरेखा अशोक वाघमारे या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले यावेळी कंधारचे तहसीलदार व्यंकट मुंंडे,कंधारचे नायब तहसीलदार तथा मुखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्या सह आदी जण उपस्थित होते.
