Home जालना पत्रकार लक्ष्मण सोळुंके हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी

पत्रकार लक्ष्मण सोळुंके हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20231009-WA0060.jpg

पत्रकार लक्ष्मण सोळुंके हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी
शेतकर्‍यांची आर्थिक लुट करणार्‍या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करा; जिल्ह्यातील पत्रकारांसह शेतकरी संघटनांही आक्रमक
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)  – जिल्ह्यातील साम टिव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह शेतकर्‍यांची आर्थिक लुट करणार्‍या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्याभरातून होत आहे. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत जिल्ह्यातील पत्रकारांसह शेतकरी संघटनांही आक्रमक झाल्या आहेत. अंबड, भोकरदनसह विविध भागातून पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक, कृषि अधिकारी यांना निवेदने देण्यात येत आहे.
या संदर्भात देण्यात येणार्‍या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगाव या गावातील शेतकरी यांच्याकडून युनिवर्सल सोमपो जनरल विमा कंपनीचे प्रतिनिधी ऑनलाईन केलेल्या तक्रारीच्या कागदपत्रांची पडताळणी व पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले असतांना नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून पैशाची मागणी करीत असल्याची माहिती साम टिव्हीचे लक्ष्मण सोळुंके यांना काही शेतकर्‍यांनी दिली. त्यावरुन खात्री करण्यासाठी व वृत्तांकनासाठी ते त्या ठिकाणी गेले असता तेथील गावगुुंडांनी वार्तांकन करण्यास मज्जाव करून तु लय पत्रकार झालाय का असे म्हणून शिवीगाळ करून कॉलर धरून धक्काबुक्की केली व तु जास्त माजला आहे, तुला पाहुन घेऊ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यासह घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यासह शेतकर्‍यांची आर्थिक लुट करणार्‍या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Previous articleझेंडेपार लोह खाणींची जनसुनावणी अन्यायकारक
Next articleप्लास्टिक पासून होणारे परिणाम यावर राष्ट्रीय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here