Home भंडारा 2024 च्या निवडणुकीत आंबेडकरी घराण्याला सहकार्य करण्याचे आवाहन-सरसेनानी आनंदराज आंबेडकर

2024 च्या निवडणुकीत आंबेडकरी घराण्याला सहकार्य करण्याचे आवाहन-सरसेनानी आनंदराज आंबेडकर

74
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_063502.jpg

2024 च्या निवडणुकीत आंबेडकरी घराण्याला सहकार्य करण्याचे आवाहन-सरसेनानी आनंदराज आंबेडकर

धम्मदूत संघरत्न मानके यांच्या हस्ते बुद्ध विहाराच्या तालुकास्तरीय विहाराचे भूमिपूजन संपन्न

लाखांदूर येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते आयोजन

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )2024 च्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी घराण्याला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी लाखांदूर येथे केले . पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जागृत होऊन मतदान करण्याचे आवाहन केले. आता रिपब्लिकन पक्षात गटाचे राजकारण उरले नसून फक्त आंबेडकरी घराण्याला सहकार्य करावे .1954 च्या पोटनिवडणुकीत बाबासाहेबांना जो कलंक लागलेला आहे तो पुसून काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याकरिता 2024 च्या निवडणुकीत एकसंघ राहून सत्ता संपादन करण्याची ताकत आपण मत पेटीच्या माध्यमातून दाखविण्याचे आवाहन आवाहन यावेळी त्यांनी केले .समजा आपण 2024 च्या निवडणुकीत सत्तेपासून दूर राहिले तर या देशात भाजपाचे सरकार आले तर हिंदू राष्ट्र घोषित करून मनुस्मृतीचे राज्य लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच बाबासाहेबांनी महिलांना जे अधिकार दिले ते अधिकार काढून घेतल्या जातील व पूर्वीप्रमाणे महिलांना चूल आणि मुल एवढ्या पुरतेच त्यांचे अधिकार मर्यादित ठेवले जातील त्यामुळे एक संघ राहण्याचे आव्हान त्यांनी केले. त्याचप्रमाणे आपण आचरणाने बौद्ध व लिखाणाने बौद्ध झालो पाहिजे कारण आचरण केले व लिखाण केले नाही तर धर्माने बौद्ध व जातीने महार राहता कामा नये परंतु लिखाण केले व आचरण केले नाही तर हे सुद्धा बरोबर नाही. म्हणून लिखाणा सोबतच आचरण केले पाहिजे असे सुद्धा आवाहन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती च्या वतीने आयोजित प्रियदर्शी सम्राट अशोक परिसर येथे भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात बोलत होते. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय बुद्ध विहार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन धम्मदूत संघरत्न मानके यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी भंते धम्मशिखर ,भंते संघानंद बुद्ध विहार पालांदूर ,श्रामनेर बुद्धपाल शांतिवन बुद्ध विहार पाथरी (चिचाड,) उपस्थित होते. त्यानंतर भव्य धम्म संमेलनाचे आयोजन दुपारी १ वाजता करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट दिलीप काकडे होते तर उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .त्याचप्रमाणे विशेष उपस्थिती पूज्य भंते प्रशिल रत्न संघकारा फाउंडेशन मुंबई, सदानंद इलमे ,रोशन जांभुळकर, तुळशीराम गेडाम ,अचल मेश्राम, दिलीप वानखेडे, धनपाल गडपायले, चरणदास मेश्राम, मेघराज अंबादे चंद्रशेखर खोब्रागडे, उपस्थित होते .त्याचप्रमाणे रात्री ८ वाजता लोकशाहीर सीमा पाटील मुंबई यांचा प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचे मुख्य संयोजक माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता, संयोजक प्राध्यापक उद्धव रंगारी ,सल्लागार प्राध्यापक अनिल काणेकर ,प्रकाश बारसागडे, अरविंद रामटेके, बुद्धिस्त समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक संदीप मोटघरे ,सचिव बबन गजभिये ,ज्योतीताई रामटेके, नीरु मेश्राम ,अर्पणाताई जांगडे ,बिंदुताई रामटेके ,वनिताताई गायकवाड परिश्रम घेतले

Previous articleसंत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न
Next articleपारंपारिक कारागिरांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घ्यावा-  सतीश घाटगे  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here