Home बीड मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सत्कार करून मराठी भाषा दिन साजरा! अँड.मनोज...

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सत्कार करून मराठी भाषा दिन साजरा! अँड.मनोज संकाये

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_071537.jpg

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सत्कार करून मराठी भाषा दिन साजरा! अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: २७  हा मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या व मित्र मंडळाच्या वतीने मराठी भाषा दिन मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे परळी परिसरात मराठी शिक्षकांचा सत्कार करून दिन साजरा करण्याची पहिलीची वेळ आहे.
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जयंती दिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने मराठी शिक्षक सुधाकर शिरसाट सर, श्रीहरी दहिफळे सर, प्रकाश मुंडे सर, शिवाजी मुंडे सर यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.महाराष्ट्रातील रहिवाशांनी मराठी भाषा ही जपली पाहिजे ते आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राहुल कांदे, अनिल चौधरी, काशिनाथ सरवदे, शिवा बडे, संतोष चौधरी, शिवाजी शिंदे, बालासाहेब चाटे, मुंजाभाऊ साठे गजानन मुंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अँड.मनोज संकाये यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी मुंडे यांनी केले. तसेच शिरसाट सरांनी मनोगत व्यक्त केले.

Previous articleटिप्पर ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक; सहाजण गंभीररित्या जखमी
Next articleजनसेवेचा_सामाजिक_बांधिलकीचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हुळवळे साहेब
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here