Home भंडारा संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न

संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_063151.jpg

संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न

100 रुग्णांनी घेतला आरोग्य तपासणी चा लाभ

शरीराचे सर्व प्रकारचे दुखणे ,मणक्यांचे सर्व समस्या व स्त्रियांच्या सर्व समस्या यावर केली जातात उपचार

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार/माडगी येथे आरोग्य शिबिर कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व सत्य साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11/12/2023 ला आयोजित करण्यात आला होता यात 100 रूग्णांनी सहभाग नोंदवून तपासणी व औषधोपचार शिबीराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाला उपस्थित सत्य साई संस्थानचे नागपूरे ,चावरे, कहालकर दुःखनिवारक दवाखाना चे डॉ.अक्षय कहालकर, डॉ. प्रियंका कहालकर, पंकज कहालकर, सेवाश्रमचे अध्यक्ष हभप कृष्णानंद चेटूले महाराज, उपाध्यक्ष ईस्तारीजी कहालकर, सचिव कौशल्याताई चेटूले, वामनजी शेंडे,फाल्गुन लांडगे, निलकंठ कायते माजी जि.प.सदस्य, संतोषजी टंडण कोटगाव, लीलाधर घाटबांधे (LIC Agent), विजयजी लांजेवार, सत्यवान चेटूले, दिनेश डोये, डॉ.चिराग चेटूले, तेजस चेटूले, गणेश चेटूले, पुरुषोत्तम कायते, अनिकेत कायते, रजत चेटूले व हितेश शेंडे व कोटगाव, नेरी, गुंथारा येथील भजनी मंडळ व संपूर्ण वारकरी संप्रदायातील बंधू-बघिनी उपस्थित होते व यशस्वितेकरिता सहकार्य केले.

शिबीरात शरीराचे सर्व प्रकारचे दुखणे व मणक्यांचे सर्व समस्या व स्त्रियांच्या सर्व समस्या ह्यावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला, कमरेत गॅप, गुडघे दुखणे,वात, लकवा सायटिका,मायग्रेन, मणक्यांचे सर्व समस्या, स्त्रीरोग ह्यांवर उपचार करण्यात आला.

मनोगत

संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे भाग्य आज लाभले,दरवर्षी आम्ही तीर्थक्षेत्र आळंदी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करतो. आज 100 वारकरी रुग्णांनी लाभ घेतला असून साक्षात विठूमाऊली चेच दर्शन झाल्याचे भास होत आहे. कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा तर्फे सर्वाना विठूमाऊलीच्या आशीर्वादाने निरोगी आयुष्य लाभो.
-डॉ.अक्षय कहालकर, भंडारा

Previous articleभंडारा येथील कहालकर दुःखनिवारक दवाखाना साई मंदिर समोर युवा मराठा प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत
Next article2024 च्या निवडणुकीत आंबेडकरी घराण्याला सहकार्य करण्याचे आवाहन-सरसेनानी आनंदराज आंबेडकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here