Home रत्नागिरी मनसे लांजा तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मनसे लांजा तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

140

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0070.jpg

मनसे लांजा तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मंगळवार ९ जुलै रोजी मोठ्या थाटामाटात व जल्लोषात संपन्न झाले. या सोहळ्यास दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश सौंदळकर प्रमुख पाहुणे होते. तर दक्षिण जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. मनिष पाथरे, संपर्क अध्यक्ष श्री.अजित राऊत यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक श्री.सुरेश गणपत लांजेकर यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

लांजा तालुका अध्यक्ष श्री.मनोज देवरुखकर, उपतालुकाध्यक्ष श्री.राकेश राऊत, समीर गुरव, प्रकाश पास्टे, प्रशांत भितले, संदीप मेस्त्री, दिपक बंडबे, शहराध्यक्ष श्री.दिलीप लांजेकर, महिला शहराध्यक्ष सौ.स्वरा राजेशिर्के, सौ.मनीषा खानोरे तसेच तालुका अध्यक्ष श्री. रूपेश जाधव, श्री. प्रकाश गुरव, श्री. दत्ता दीवाळे संपर्क अध्यक्ष यासह सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मनसैनिक यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी लांजा तालुक्यात मनसे पक्ष व हिंदुजननायक श्री. राजसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचण्याचा निर्धार सर्वांनी केला.

Previous articleकोवळ्या वयामध्येच मुलींचे हात पिवळे…
Next articleपुराच्या पाण्याचा खाडीभागातील सुमारे पंधरा ते सोळा गावांना वेढा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.