• Home
  • 🛑 कोरोना काळातल्या परिस्थितीला कंटाळून नृत्यांगनेनं २१ व्या वर्षीच संपवलं आयुष्य 🛑

🛑 कोरोना काळातल्या परिस्थितीला कंटाळून नृत्यांगनेनं २१ व्या वर्षीच संपवलं आयुष्य 🛑

🛑 कोरोना काळातल्या परिस्थितीला कंटाळून नृत्यांगनेनं २१ व्या वर्षीच संपवलं आयुष्य 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ नैराश्येतून आत्महत्या केलेल्या कलाकारांच्या बातम्या सतत कानावर येत असताना पुण्यातून अशीच एक धक्कादायक बातमी आली आहे. कोविड काळात आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विशाखा काळे या लोककलावंत आणि नृत्यांगनेनं अवघ्या 21 व्या वर्षीच आयुष्य संपवलं. मंगळवारी दुपारी विशाखाने राहत्या घरीच आत्महत्या केली.

विशाखा काळे ही प्रसिद्ध नृत्यांगना प्रियांका काळेची बहीण. पोलीसनामाने दिलेल्या बातमीनुसार, विशाखाला चित्रपटांमध्ये करिअर करायची इच्छा होती. पण तिचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यात तिच्या चेहऱ्याला जखम झाली आणि बरेच दिवस घरी बसावं लागलं. त्यानंतर corona कहर सुरू झाला आणि कार्यक्रमच ठप्प झाले. त्यामुळे घरची परिस्थिती बिघडली.

पुण्यात हडपसर परिसरात काळे कुटुंब राहतं. मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन विशाखाने आत्महत्या केली. विशाखाचे वडील अंध आहेत. आई एका शाळेत नोकरी करायची पण आता घर विशाखावरच अवलंबून होतं. वेगवेगळे स्टेज शो आणि लोककलांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विशाखा चरितार्थ चालवत होती. पण Coronavirus मुळे सगळी परिस्थिती पालटली. गेल्या 6 महिन्यात एकही कार्यक्रम होऊ शकलेला नाही.

हाती असलेला पैसा संपत चालला आणि यामुळे कंटाळून विशाखाने टोकाचं पाऊल उचललं.महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून विशाखा काळे लावणी सादर करत असे. कोरोना काळात हातात कुठलंच काम नसल्याचे घरची परिस्थिती हलाखीची बनली होती.

अनेक लोककलावंतांची हीच हालत असल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे. Coronavirus मुळे अनेकांच्या हातचं काम गेलेलं आहे. कलेवर जगणाऱ्या सामान्य कलाकारांचं आयुष्य भीषण झालं असल्याचं यातून दिसतं….⭕

anews Banner

Leave A Comment