• Home
  • 🛑 शिवसेना मंत्र्यांचा संताप…..! सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही 🛑

🛑 शिवसेना मंत्र्यांचा संताप…..! सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही 🛑

🛑 शिवसेना मंत्र्यांचा संताप…..! सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा – :⭕ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली, ‘एक राजा बिनडोक’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता उदयनराजेंवर प्रहार केला. त्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना इशारा दिला आहे.

याबाबत शंभुराज देसाई म्हणाले की, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जी टीका केली ती निंदणीय आहे, त्यांची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे.

छत्रपती घराणं, त्यांच्या गादीला महाराष्ट्रातील जनता वंदन करत असते. दोन्हीही छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशाप्रकारे टीका करणे हे गैर आहे, चुकीचं आहे, आम्ही सातारकर, छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

तसेच आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला दोन्ही राजेंनी त्यांची भूमिका सरकारकडे ठेवली आहे.

सातारच्या गादीचा अवमान कधीही सहन करणार नाही, २०१४ मध्ये खासदार उदयनराजेंवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही विधिमंडळाचं सभागृह कामकाज बंद पाडलं होतं, त्यामुळे सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी त्यांच्या छत्रपतींच्या वारसावर केलेली टीका सहन करणार नाही असं शंभुराज देसाईंनी सांगितले…⭕

anews Banner

Leave A Comment