Home सोलापूर पंढरी नगरी भक्तांचा महापूर

पंढरी नगरी भक्तांचा महापूर

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0002.jpg

पंढरी नगरी भक्तांचा महापूर

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

दोन वर्षांपूर्वी आषाढी व कार्तिक यात्रेवर आलेल्या कोरोना या संसर्गजन्य साठीच्या रोगामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता त्याला पंढरपूर ही अपवाद कसे असेल त्यामुळे गेले दोन वर्ष विठ्ठलाची नगरी ही भक्ताविना सुनी सुनी होती ना आषाढीला ना कार्तिकीला चैत्री व मागे वारीला विठ्ठल नामाचा गजर नाटाळ चिपळ्यांचा मृदंगांचा नाद यामुळे पंढरी नगरीत गत आषाढी व कार्तिकी ला पंढरी नगरीत अप्रत्यक्ष कर्फ्यूचे रूप होते त्यामुळे विठ्ठलाच्या भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही गेले 20 दिवस आळंदी ते पंढरपूर आषाढी कार्तिक यात्रेच्या सोहळ्याची मादियाळी पंढरपूर पासून अवघ्या सात किलोमीटरवर येऊन विसावली असून प्रत्येक भाविक भक्त वारकरी हे चंद्रभागा स्थान व विठ्ठल दर्शन आसुसला आहे केवळ विठ्ठलाच्या पदस्पर्शाने जी विलक्षण अनुभूती विठ्ठल भक्तांना येते
त्यातून तो वर्षभर ऊर्जा साठवून आपला दिनक्रम करत असतो परंतु या सर्वाला गेल्या दोन वर्ष करुणामुळे विठ्ठल व भक्त यांच्यामध्येही कोरोना रुपी संसर्गजन्य रोगाचे भित आडवी होती हा संसर्गजन्य रोगांचे चावट कमी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व व्यवहार थोड्याफार प्रमाणात सुरळीत चालू झाले आणि पुन्हा एकदा विठ्ठल भक्त भाविक वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊन आषाढी एकादशीच्या सोहळ्या करता पंढरी नगरीत लक्षावधी वारकरी आणि गर्दी केली आहे जिकडेतिकडे आज पंढरीनाथ रंगबिरंगी वस्त्रे परिधान केलेले तर पांढरा शुभ्र वस्त्र मध्ये पंढरीचा वारकरी वावरताना दिसून येत आहे दोन वर्षांच्या संसर्गजन्य रोगांच्या छायातून पंढरी नगरी थोड्याफार प्रमाणात मुक्त झाल्याने आज सर्वत्र वारकरी भाविक यांचा मुक्त वावर होताना दिसून येत आहे पंढरी नगरीत प्रसादिक दुकानासहित विविध प्रकारचे स्टॉल खेळणे मनोरंजनासाठी साधने आधीचे रेलचेल झाली असून यात्रा काळात आलेल्या भाविक वारकरी भक्त यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून यंदा प्रथमच पंढरीतील महत्त्वाच्या ठिकाणी चंद्रभागा वाळवंट परिसर प्रदक्षिणामार्ग आदी ठिकाणी तिसऱ्या डोळ्यांची अर्थात सीसी कॅमेरा द्वारे अनुचित प्रकारावर पोलीस प्रशासनाची यांच्या साह्याने नजर आहे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शाने दर्शनाच्या रांगेत सुमारे दोन ते तीन लाख भाविक असून हे दर्शनाची रांग विठ्ठल मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे तसेच ज्या भाविक भक्तांना व वारकरी यांना लाखो लाखोच्या मांडी आहेत प्रत्यक्ष विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेता येणार नाही अशा भाविक भक्त वारकरी यांच्यासाठी विठ्ठलाच्या व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनाची सोय तसेच रिद्धी सिद्धी गणपती जवळ मोठे टीव्ही लावण्यात आला असून
रांगेतील लोकांना विठ्ठलाचे दर्शन होत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी व पावसासाठी रक्षण व्हावे याकरता दर्शन रांगेमध्ये आडोसा केला आहे सर्व विठ्ठल नामांचा गजर चालू असून दोन वर्षानंतर प्रथमच नगरीतील मठ धर्मशाळा लॉजिस खाजगीवाडे वारकरी भाविकांनी गजबजून गेले आहेत तर आषाढी एकत्र करता आलेल्या शेकडो भाविकांनी मोकळ्या जागे तात्पुरत्या स्वरूपाची ताडपत्री उभारून निवासाची सोय केली आहे तर राज्य परिवहन महामंडळाने विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी दर्शन झालेल्या भाविकांना थेट आपल्या गावी जाण्यासाठी एसटीची सोय केली आहे आषाढी यात्रेच्या निमित्ताने शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर तात्पुरती बस स्थानके उभारण्यात आली आहे आहेत सध्या पंढरीत लक्षवधी वारकऱ्यांनी गर्दी केली असून सर्वत्र माऊली माऊली विठ्ठल नामाचा गजर चालू आहे दोन वर्षानंतर प्रथमच चंद्रभागा स्थानाचा लाभ घडत असल्याने आलेले भाविक वारकरी वारकरी भक्त स्थानासाठी चंद्रभागा नदीवर
गर्दी करत असताना दिसून येत आहेत आषाढी यात्रेची शासनाच्या वतीने करण्यात येणारे एकादशी दिनी चे महापूजा राज्याचे नुकतेच झालेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तसेच त्यांच्याबरोबर दोन वर्ष खंडित झालेल्या दर्शना रांगेतील पहिल्या विठ्ठल भक्ताला ही त्याच्या समवेत विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान लाभणार आहे सध्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल नगरी विठ्ठल भक्त आणि गजबजुन होऊन गेली आहे

Previous articleबालशिवाजी इंग्लिश स्कूल वानखेड फाटा येथे पंढरीच्या पालखीचे आयोजन
Next articleरिमझिम पावसात दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here