Home बुलढाणा बालशिवाजी इंग्लिश स्कूल वानखेड फाटा येथे पंढरीच्या पालखीचे आयोजन

बालशिवाजी इंग्लिश स्कूल वानखेड फाटा येथे पंढरीच्या पालखीचे आयोजन

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0015.jpg

बालशिवाजी इंग्लिश स्कूल वानखेड फाटा येथे पंढरीच्या पालखीचे आयोजन                                  संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्रमध्ये ‘आषाढी एकादशी’ ला विशेष महत्त्व आहे परंपरागत समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी पंढरपुर वारीला सुरुवात झाली असुन,यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात.त्यांना’ वारकरी’ तसेच वारकऱ्यांची पंढरपुर वारी’ असं संबोधले जाते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलाचा जप करत पायी पंढरपूर वारीला जाण्याची परंपरा फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली असते .दरवर्षी भक्त पायदळ पंढपूरला जातात,मागील दोन वर्षात कोरोनाकाळात भक्तांची चुकलेली पंढरीची वारी यावर्षी हजारो भक्तांसह पंढरपूरला निघाली आहे.यंदा आषाढी एकादशी रविवारी 10 जुलै 2022 रोजी येत आहे
आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकान वरुन पालखी घेऊन सगळे वारकरी भक्त या आषाढी एकादशीच्या शुभ दिवसापर्यंत पंढरपूरी पोहोचले असतात.

संथापक अध्यक्ष कर्मवीर स्वर्गीय जनार्धनजी चोपडे ,बळीराजा शिक्षण संथा यांच्या प्रेरणेतून उभारलेल्या संग्रामपूर तालुक्यातील बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, वानखेड फाटा येथे आज आपल्या महाराष्टाच्या परंपरेचा वारसा जोपासता यावा मुलांवर अध्यात्मिक संस्कार घडावे या माध्यमातून विठ्ठल वारीचे आयोजनचा हा छोटासा प्रयत्न बालशिवाजी इंग्लिश स्कूल सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी यांच्या आयोजनातुन करण्यात आला यामध्ये आज विविध विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुशेत आपल्या भूमिका बजावल्या.शाळेच्या प्रांगणामध्येत्यामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयजय करून पावली,फुगडी,तसेच नृत्य सादर करण्यात येऊन विठ्ठलाचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठलाची आरती करण्यात आली “पुंडलिका वरदे श्री हरी विठ्ठल! श्री नामदेव तुकाराम!!विठ्ठलजप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
कार्यक्रमाला उपस्थित सर्व विज्ञार्थी, पालक वर्ग असुन शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड सर, संदीप साळुंके सर,ठाकरे सर,धर्माळ मॅडम,धानोरकर मॅडम, गोल्हर मॅडम,गायकवाड मॅडम, झाडोकार मॅडम, खंडेतोड मॅडम,म्हसाळ मॅडम,दामधर मॅडम,नांदणे मॅडम ,गाळकर मॅडम,संदीप गायकी, विलास खंडेराव,निर्मालाबाई लहुकर ,संतोष गायकी यांनी अथक परिश्रम घेतले

Previous articleआषाढी एकादशी निमित्ताने शेंगाव पायदळ वारीतील भक्तांकरिता चहा पाणी वितरण सेवा लाभ
Next articleपंढरी नगरी भक्तांचा महापूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here