Home पुणे सांगवी मध्ये विद्युत महावितरण महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या दुर्घटना पासून बचाव नागरिकांनी...

सांगवी मध्ये विद्युत महावितरण महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या दुर्घटना पासून बचाव नागरिकांनी मानले विशाल क्षीरसागर यांचे आभार

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0018.jpg

सांगवी मध्ये विद्युत महावितरण महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या दुर्घटना पासून बचाव नागरिकांनी मानले विशाल क्षीरसागर यांचे आभार
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
सांगवी २ :- सांगवी भागातील कृष्णा चौका नजीक असणाऱ्या सोसायटी बाहेरील डीपीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि त्या आगीच्या ठिणग्या मोठ्या प्रमाणात खाली पडत होत्या माझा प्रभाग माझा विकास या धोरणाने विशाल क्षीरसागर यांनी एमएसईबी ऑफिसला फोन केला असता तेथील ऑपरेटर तुषार रगतवार यांनी फोन उचलून कार्य तत्परता दाखवत त्वरित घटनास्थळी त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच संतोष सर्जे, निलेश सूर्यवंशी आणि सागर बुरडे हे दाखल झाले त्यांनी तेथील सर्व परिस्थिती लक्षात घेता त्वरित क्षणाचाही विलंब न लावता प्रथमता डीपी बंद करून बाजूची वाळू घेऊन आगेवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि सर्व डीपीचे क्षेत्र जागेवर नियंत्रित केले पहाटे सकाळची वेळ असल्यामुळे सर्व नागरिक गाढ साखर झोपेत होते.
मोठी दुर्घटना घडले असते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊनच ही कार्यतत्परता दाखवली तिथे असलेले स्थानिक नागरिकांनी दिलीप पाटील, सुरेश ठाकूर आणि राजेश साळुंखे घटनास्थळी उपस्थितांनी मानले विशाल क्षीरसागर यांचे आभार
विशाल क्षीरसागर यांनी दिली माहिती पुढीलप्रमाणे सकाळी पहाटे पावणे सहा वाजायच्या सुमारास मी कृष्णा चौकात चहा पिण्यासाठी गेलो असता मला तिथे एमएसईबी ला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र विद्युत महामंडळ विभागाला फोन करून मी कळवले असता एम एस ई बी चे कर्मचारी संतोष सर्जे, निलेश सूर्यवंशी, आणि सागर बुरुडे त्वरित घटनास्थळी हजर झाले. आणि त्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळून सर्व डीपी जागेवर नियंत्रित केला आणि सर्व आग विझवण्यात आली.घटनास्थळी असलेले दिलीप पाटील सुरेश ठाकूर आणि राजाभाऊ यांनी सर्वांनी मदत केली.

Previous articleमराठयांनो,आरक्षणासाठी आत्महत्या करु नका! नांदेड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली                   
Next articleस्वच्छता हिच सेवा : एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here