Home Breaking News 🛑 महिंद्राचे बोलेरो पिक-अपसाठी करोना विमा 🛑

🛑 महिंद्राचे बोलेरो पिक-अपसाठी करोना विमा 🛑

148
0

🛑 महिंद्राचे बोलेरो पिक-अपसाठी करोना विमा 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 12 ऑक्टोबर : ⭕ महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचा भाग आणि गेल्या दोन दशकांपासून भारतीय पिक- अप क्षेत्रात असलेल्या कंपनीने आज त्यांच्या लोकप्रिय बोलेरो पिक- अप श्रेणीसाठी करोना विमा योजना जाहीर केली आहे. हा उपक्रम कंपनीच्या मेगा फेस्टिव्ह ऑफरचा भाग असून समाजाचे देणे फेडण्याच्या महिंद्राच्या तत्वातून तयार झालेला आहे.

मोफत करोना विमा हा एक लाख रुपयांपर्यंतचा फ्लोटर आरोग्य विमा कवच असून तो ग्राहक व त्याचा जोडीदार आणि दोन मुलांपर्यंत लागू असेल. हा विमा नवे वाहन खरेदी केल्याच्या तारखेपासून ९.५ महिने कालावधीसाठी वैध असेल. हा विमा लागू असलेल्या बोलेरो पिक अप श्रेणीमध्ये बोलेरो पिक- अप, बोलेरो मॅक्सी ट्रक, बोलेरो सिटी पिकअप आणि बोलेरो कॅम्पर यांचा १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत समावेश असेल.

करोना विमा योजना पुरवण्यासाठी महिंद्राने ओरिएंटल विमा कंपनीशी करार केला आहे. पिक-अप बाजारपेठेतील आघाडीची कंपनी या नात्याने आम्ही या ‘चाकावरच्या योद्ध्यांना’ सलाम करत, त्यांच्या प्रवासात भागीदार होण्याचे, त्यांना थोडा पाठिंबा देण्याचे, त्यांना मनःशांती देण्याचे आणि सध्याच्या आव्हानात्मक काळात त्यांची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करायचे ठरवले आहे, असे महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या विक्री व ग्राहक सेवा, ऑटोमोटिव्ह विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतींदर सिंग बाजवा म्हणाले.

महिंद्रा पिक-अप क्षेत्रात कित्येक गोष्टी पहिल्यांदाच करण्यासाठी प्रसिद्ध असून त्यात पहिले फ्लॅट- बेड कार्गो पिक अप, पहिले डबल केबिन पिकअप, पहिले एसी पिक अप किंवा पहिले सीएनजी पिक अप यांचा समावेश आहे. ग्राहकाच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्याचे आणि त्यांना जास्त पैसे मिळवून देण्यासाठी व आयुष्यात प्रगती करण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे.⭕

Previous article*सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक कोल्हापूरात*
Next article🛑 लाँच आधीच समोर आली iPhone 12 ची किंमत, एकत्र ४ आयफोनची लाँचिंग 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here