Home गुन्हेगारी ब्राम्हणगाव अजमीर रस्त्यावरील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरटयांकडून लंपास

ब्राम्हणगाव अजमीर रस्त्यावरील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरटयांकडून लंपास

31
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20221026-064802_WhatsApp.jpg

श्री.जगदिश बधान सटाणा प्रतिनिधी अजमिर सौंदाणे:-
येथील अजमेर-सौंदाणे ब्राम्हणगाव रोड लगत असलेल्या ब्राम्हणगाव साई सेवक मंडळी ट्रस्ट ने साकारलेल्या श्री साई बाबा- द्वारकामाई मंदिरातील दानपेटी सोमवारी(ता.२४) मध्यरात्रीच्या सुमारास दानपेटीतील अंदाजीत असलेली तीस हजार रुपये रकमेची दान पेटीच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.नित्यनेमाने मंगळवारी (ता.२५)सकाळी नेहमीप्रमाणे श्री साई बाबा मंदिरातील पुजारी त्रंबक सुपडू पवार (बाबा) मंदिरात आरती साठी आले असता मंदिराचा दरवाजाचे कुलुप तोडून बाजूला खिडकीत ठेवल्याचे दिसून आले, त्यानंतर पुजारी बाबा यांनी आत प्रवेश करून मंदिरातील असलेली दान पेटी नसल्याचे लक्षात आल्याने पुजारी बाबा यांनी ट्रस्टचे अध्यक्ष दिपक अहिरे, उपाध्यक्ष शशिकांत बच्छाव, सचिव तुषार अहिरे यांना सांगितले, त्यानुसार सदर घटनेची माहिती सटाणा पोलिसांना दिली असता सटाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, यांसह लखमापूर ओपी चे पोलीस नाईक अतुल आहेर, संतोष भगरे, दिपक सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती घेऊन व पाहणी करून पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर पुढील तपास
सटाणा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व पोलीस अतुल आहेर हे करत आहेत
सदर घटनेचा लवकरात लवकर तपास करावा व चोरट्यांना शासन करावे अशी मागणी परिसरातील साई भक्तांनी केली आहे

Previous articleचौगांव बर्डी सुकड परिसरात आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप
Next articleमहाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ बांधवाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here