Home नांदेड मराठयांनो,आरक्षणासाठी आत्महत्या करु नका! नांदेड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा...

मराठयांनो,आरक्षणासाठी आत्महत्या करु नका! नांदेड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली                   

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0028.jpg

मराठयांनो,आरक्षणासाठी आत्महत्या करु नका! नांदेड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली                                                    नांदेड (संजय कोकेंवार ब्युरो चीफ)– मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर सरकारला एक महिन्याचा अवधी दिल्यानंतर परत त्यांनी दहा दिवस वाढवून दिले असुन,ते २४ ऑक्टोबर रोजी मुदत संपत असल्यामुळे त्याआधी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात १२ जिल्ह्याचा दौरा सुरू केलेला असून,दौऱ्याचा दुसरा दिवस नांदेड येथे काल दि. १ ऑक्टोंबर रोजी नवीन मोंढा नांदेड येथे त्यांची भव्यसभा पार पडली गेली.या सभेस संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेस जरांगे पाटील यांनी समाजापुढे बोलताना मराठा समाजाचे दुःख व वेदना हे फक्त आरक्षण आहे.तरी सरकारने या मराठ्यांची भावना ओळखून घ्यावे.सरकारने आता आरक्षणाच चॉकलेट दाखवण्याचं काम करू नये.आरक्षण हे आम्ही आता अर्धवट घेणार नाहीच,असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.पाच हजार पुरावे सापडले असून,त्या पुराव्याच्या आधारे सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे.आता सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन सरकारने पूर्णविराम द्यावे असे सरकारला विनंती करण्यात आली.मराठा समाजापुढे जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केले आहे की,आरक्षण देण्याचं काम माझं आहे आणि ते घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.फक्त तुम्ही आत्महत्या करू नका.शांततेच्या मार्गाने मोर्चा उपोषण चालू ठेवा.तुम्ही आत्महत्या केल्यानंतर हे आरक्षण भेटूनहि काही उपयोग नाही.असे जरांगे पाटलांनी सांगितले.या सभेस संपूर्ण जिल्ह्यातील लाखो मराठ्यांनी आपापल्या स्वखर्चाने उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांना हिम्मत देण्यासाठी जमले होते जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!एक मराठा लाख मराठा!आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं!अशा घोषणा देऊन संपूर्ण नांदेड जिल्हा दणाणून सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here