• Home
  • देगलूर येथे नळाचे पाणी दोन दिवसा आड सोडून नागरिकांची गैरसोय थांबवावी ; गटनेता प्रशांत दासरवाड

देगलूर येथे नळाचे पाणी दोन दिवसा आड सोडून नागरिकांची गैरसोय थांबवावी ; गटनेता प्रशांत दासरवाड

देगलूर येथे नळाचे पाणी दोन दिवसा आड सोडून नागरिकांची गैरसोय थांबवावी ; गटनेता प्रशांत दासरवाड

नांदेड – राजेश एन भांगे

देगलूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून नळाचे पाणी पाच दिवसा आड सोडले जात आहे.
पण सद्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शहरवासीयांना जास्तीच्या पाण्याची आवश्यकता असते.
तसेच पाचव्या दिवशी नळाला पाणी येत असल्याने सर्वांकडेच पाच दिवसांच्या पाण्याची साठवणूक क्षमता राहू शकते असे नाही.
व एखाद्या वेळी दुर्दैवाने करडखेड येथील विद्युत पुरवठा खंडित झाला किंवा मुख्य पाईप लाईन फुटून गळती झाली तर पाणी पुरवठा खंडित होऊन नळाला पाणी येण्यास अजून दोन ते चार दिवस उशीर होत आहे.
अन त्यामुळेच सर्व सामान्य नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा होत असून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पाच दिवसा आड सोडण्यात येणारे नळाचे पाणी दोन दिवसा आड सोडण्या यावे अशी मागणी दि. २ मार्च रोजी नगर सेवक तथा गट नेता (भाजप) प्रशांत दासरवाड, व भाजप शहराध्यक्ष अशोक गंदपवार यांनी देगलूर मुख्याधिकारी श्री इरलोड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

anews Banner

Leave A Comment