Home Breaking News चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अशोक देवकत्ते यांची निवड

चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अशोक देवकत्ते यांची निवड

94
0

चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अशोक देवकत्ते यांची निवड
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नवीन कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी अशोक देवकत्ते तर सचिवपदी बालाजी राजुरे यांची दिनांक 01 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभागृहात विशेष बैठक घेऊन हि निवड करण्यात आली आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण रामदिनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष अशोक देवकत्ते, कार्याध्यक्ष रामराव भंगरवाड, उपाध्यक्ष कौरवार, सचिव बालाजी राजुरे, संघटक कदिरे, कोषाध्यक्ष गणेश राचुटकर, संपर्कप्रमुख अशोकसिंह चौहाण, एल. के. कांबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रामदिनवार, जिल्हा संपर्कप्रमुख माधव गोरे, जिल्हा संघटक जे.जी.रणबिडकर, एस.एस. गायकवाड, बालाजी पाटील, शोभा भुरे, जब्बार शेख, सुमन कांबळे, हनिफाबी शेख आदी उपस्थित होते.
त्यांच्या निवडीबद्दल गटविकास अधिकारी तुकाराम भालके, जि.प.बा. चे उपभियंता चितळे, जि.प.ळ.पा. चे उपअभियंता चव्हाण, एकात्मिक बालविकास चे प्रकल्प संचालक राजुरे, यांच्या सह भाजपचे नेते रज्जाक शेख (पाशा पटेल), राजू सुवर्णकार, प्रकाश भांगे, रहीम शेख, सुधाकर करकेलवार, गंगाधर पाटील, आलावली शेख, गफार शेख,गजानन पेंडकर, पंचायत समिती कक्षाधिकारी गुट्टे, ग्रामसेवक संघटनेचे सचिन पाटील कुन्द्राळकर आदींनी अभिनंदन करून अशोक देवकत्ते यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here