Home Breaking News अर्धापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय...

अर्धापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न..

153
0

अर्धापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मा.ना.श्री.अशोकराव चव्हाणसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड. यांच्या सूचनेनुसार तालुका अर्धापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता व कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकामाचे भूमीपूजन मा.सौ.मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड यांच्या शुभ हस्ते पार पडले. Covid-19 परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या नियमांचे पालन करुन सदरील कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. गोविंदराव नागेलिकर जिल्हाध्यक्ष काँ.कमिटी नांदेड, प्रमुख अतिथी श्री.संजयजी लहानकर सरचिटणीस काँ.कमिटी नांदेड,श्री गणपतरावजी तिडके चेअरमन, श्री.बालाजी गव्हाणे तालुका अध्यक्ष, श्री.शेख लईक नगराध्यक्ष,सौ.पतंगे मॅडम, श्री.प्रशांत कोरे कार्यकारी अभियंता, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कोरोना चे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

Previous articleप्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
Next articleचतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अशोक देवकत्ते यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here