Home Breaking News पालघर. चारोटी येथे हायवे मृत्युंजय दूत योजेनेचे उद्घाटन करण्यात आले. सडक सुरक्षा...

पालघर. चारोटी येथे हायवे मृत्युंजय दूत योजेनेचे उद्घाटन करण्यात आले. सडक सुरक्षा जिवन सुरक्षा.

181
0

पालघर.
चारोटी येथे हायवे मृत्युंजय दूत योजेनेचे उद्घाटन करण्यात आले.
सडक सुरक्षा जिवन सुरक्षा.

महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावत येणार मृत्युंजय दुत म्हणून नवीन योजना राबवली जात आहे, राज्यातील महामार्गावरील होणाऱ्या अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आता हायवे मृत्युंजय दुत काम करणार आहेत. या विषयी सविस्तर बोलताना , हायवें मृत्युंजय दुत हे अन्य दुसरे तिसरे कोणी नसून हायवे लगत असणारे
लोक असतील महामार्गाचे परिसरातील गावातील नागरिक, तेथील हॉटेल, धाबे, मॉल, पेट्रोलपंप वरील कर्मचारी ही भूमिका बजाविणार आहेत. महामार्ग वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक Dr भूषण कुमार उपाध्याय यानी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ही योजना 1 मार्च पासून राबविण्यात येत आहे. देशात दरवर्षी दिड लाख नागरिक आपला जीव गमावतात राज्यात त्याचे प्रमाण सरसरी साडे अकरा हजार आहे, महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत अपघातात ५०१२९ जणांचा बळी गेला. त्यामध्ये अनेकांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने जीवाला मुकावे लागले.
ही परिस्थिती बदलण्यासाठी हायवे मृत्युंजय दुत ही योजना राबवली जात आहे. महामार्गाच्या परिसरात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी चार पाच नागरिकांना गट बनवुन त्यांना ओळखपत्र दिले जाईल. अपघाग्रस्तांना मदत केल्यास पोलिसांच्या ससेमिरा त्यांच्या मागे लागणार नाही हे पटवुन देऊन परीसरात एखादी घटना घडली असता अपघात ग्रस्तांना कसे हाताळावे, तातडीने प्रथमोपचार कसे करावे या बाबत स्वयंसेवी सस्थांमार्फत मदतीने दोन तासाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाईल त्यांना एक स्त्रेचर व फर्स्ट एड बॉक्स साहित्य पुरवले जाईल त्यांना महामार्गावरील १०८ क्रमांकाची रुग्ण वाहिका तसेच हॉस्पिटल ची माहिती त्यांचे नंबर उपलब्ध करून दिले जातील जेणे करून त्यांना जखमींना त्या ठिकाणी गोल्डन अवर मध्ये पोहचविता येईन दुर्घटनेच्या ठिकाणी त्वरित पोहचून मदत कार्य चागलं काम करणाऱ्या या दुताना सबंधित महामार्गाचे अधिकारी कडून प्रमाणपत्र दिले जाईन. तसेच संबंधिताची माहिती राष्ट्रिय पुरस्कारासाठी पाठवली जाईल. या योजने अंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल अधिकाऱ्यांना प्रत्येक पंधरवड्यात ट्रॅफिक पोलीस चौकी कडून मुख्यालयाला पाठवणे बंधन कारक केलं आहे.
अपघात घटना घडल्यानंतर पोलीस
पोहचेपर्यंत जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे जेणे करून महामार्गावरील अपघात तसेच मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी मोलाची साथ मिळेल. या कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटन कासा ग्रामपंचात सरपंच, उपसरपंच तसेच चारोटी गावाचे सरपंच उपसरपंच धुंदल वाडी गावाचे पोलीस पाटील यांचा हस्ते करण्यात आले कार्यक्रमा करिता हाय वे लगतचे हॉटेल ढाबा मालक पेट्रोल पंप कर्मचारी नेहमी अपघाताच्या वेळी धाऊन येणारे हायवे लगतचे गावाचे ३० ते ३५ नागरिक आय आर बी चे सेफ्टी मॅनेजर हायवे पोलीस चे कर्मचारी स्थानिक cr मोबाईल चे कर्मचारी हद्दीतील पत्रकार उपस्थित होते. सदर योजना कशी प्रभावी पणे राबवली जाईल या करिता मार्गदर्शन
करून योजनेचा हेतू व फायदे सांगून उस्फुर्तपणे सहकार्य करण्यास महामार्ग पोलिस केंद्रं चारोटी चे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री अनिल रायपूरे यांनी आवाहन केले.

Previous articleदेगलूर येथे नळाचे पाणी दोन दिवसा आड सोडून नागरिकांची गैरसोय थांबवावी ; गटनेता प्रशांत दासरवाड
Next articleझेप प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल माय मराठी फाउंडेशनतर्फे सन्मान..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here