• Home
  • झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल माय मराठी फाउंडेशनतर्फे सन्मान..

झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल माय मराठी फाउंडेशनतर्फे सन्मान..

 

झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल माय मराठी फाउंडेशनतर्फे सन्मान..

झेप प्रतिष्ठान ने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत मराठी अस्मितेसाठी कार्य करणाऱ्या माय मराठी फाउंडेशन तर्फे मराठी भाषा दिनानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झेप प्रतिष्ठानला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले..झेप प्रतिष्ठान या संस्थेने कोरोना काळात जवळपास ८०० कुटुंबांना मदत केली होती तसेच आदिवासी पाड्यात शैक्षणिक उपक्रम तसेच मेडिकल कँप घेत असते..

या प्रसंगी माय मराठी फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश मिस्कीन, अनिल शिंदे पाटील, उपेश ओंबळे, सतीश भोज, विलास सावंत, मंगेश धंद्रे,शैलेश वासनकर,अभिजित देसाई,विपुल मोरे उपस्थित होते. तसेच झेप प्रतिष्ठान तर्फे अनिल औताडे, संदीप गोळे, सिद्धांत बोचरे, अभिजित खराडे आणि प्रदीप चौगुले उपस्थित होते अशी माहिती झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विकास धनवडे यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment