Home सामाजिक माणुसकी

माणुसकी

99
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_195451.jpg

माणुसकी

देवाने प्रत्येकाला मन दिलेले आहे.प्रत्येक मनात विचार ,संवेदना, आनंद,दु:ख,आशा, निराशा अशा कितीतरी भावना सामावलेल्या आहेत.ज्यात माणुसकी आहे त्या माणसात देवाचा अंश आहे असे आपण म्हणू शकतो.माणुसकी म्हणजे इतरांविषयी वाटणारी सहानुभूती,कदर, समोरच्याचा आदर, कुठलीही अपेक्षा न ठेवता दुस-याची केलेली मदत.ज्याच्यात माणुसकी असते तो मनुष्य दुसऱ्याला ऐनकेन प्रकारे सहाय्य करतो.त्यासाठी तो आपले दु:ख बाजूला ठेवून इतरांसाठी झटतो.
माणुसकीची ओळख माणसाच्या विचारातून, बोलण्यातून, आचरणातून होत असते.पण आज परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही.आजचा माणूस माणुसकी विसरत चाललाय.याचा परिचय आपल्याला पदोपदी येतो.जो-तो फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू लागलाय.दुस-याचा त्रास,दुस-याचे दु:ख याच्याशी कुणालाही काही देणेघेणे नसते.माणसातली माणुसकी कुठेतरी हरवून गेली आहे.आत्ताची परिस्थिती बघता माणूस माणसात नाही.त्यामुळे फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे.परक्यांशी माणुसकीचे नाते जपणे तर सोडाच,घरच्यांशीही माणुसकीने माणूस वागत नाही.जो-तो आपल्या विश्वात रमलाय.मानवी मन माणसाच्या विपरीत वागण्याने त्रासून गेले आहे.माणूस कुठेतरी एकटा पडत चाललाय.त्याची शांती कुठेतरी हरवून गेली आहे.आजचा माणूस जास्तीतजास्त आत्मकेंद्री होत चाललाय.त्याला फक्त स्वतःचाच विचार असतो.जीवन यंत्रगत झाले आहे.
किती सोपा शब्द आहे माणुसकी.पण याचा अर्थ आज माणूस विसरत चाललाय.आजच्या धावपळीच्या जगात माणसाला आपल्या माणसांची चौकशी करायला सुध्दा वेळ नसतो.असे कित्येक प्रसंग आयुष्यात येत असतात जेव्हा आपल्यासाठी कोण झिजतो,कोण चांगले किंवा वाईट वागतो याचा प्रत्यय येत असतो.माणसाचे मोठेपण त्याच्या वयानुसार ठरत नसून त्याची वागणूक,त्याचा दृष्टीकोन, नात्यांमध्ये जपलेले प्रेम यातून ठरत असते.माणसाने आज अवकाशाला गवसणी घातली आहे.परंतु त्याचे वागणे अतिशय स्वार्थी झाले आहे.एखाद्या माणसाचा अपघात झाला की काही माणसे अपघातग्रस्त व्यक्तीची मदत न करता त्याचा व्हिडिओ काढत बसतात.ही आहे का माणुसकी? नक्कीच नाही.काही माणसे जाती- धर्माच्या नावावर इतरांना नाहक त्रास देतात जे अगदी चुकीचे आहे.जनावरे तरी एकवेळ परवडली,पण माणूस आपल्या वागण्यातून, बोलण्यातून जास्तच घातक, हिंस्र झाल्याचे दिसून येते.आजच्या धावपळीच्या जीवनात काही कारणांमुळे एकमेकांविषयी द्वेष, गैरसमज निर्माण होतात आणि संबंधांमध्ये एक गाठ पडते.माणसाने सारेकाही आपल्या बुध्दीच्या जोरावर पादाक्रांत केले आहे.माणसाचे कर्तृत्व खरेच वाखाणण्याजोगे आहे.पण याच हुशारीमुळे त्याला गगन ठेंगणे वाटू लागले आहे. माणूस आपल्या लोकांशी, समाजाशी असलेलं नातं विसरत चाललाय.खरंतर एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात खरी माणुसकी आहे.कित्येक घरांमध्ये भावाभावांचे,बहिणीबहिणींचे,
बहिणभावाचे पटत नाही.त्यांच्यात आपुलकी, जिव्हाळा राहिला नाही.कुटुंबपातळीवर प्रेम,त्याग,लोभ, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी लोप पावत आहेत.कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला मानसिक आधाराची गरज असते.अशावेळी जर आपले लोकच आपल्याला सांत्वना देऊ शकले नाही तर काय उपयोग? मिळणा-या थोड्या आधारानेही दु:खात असलेली व्यक्ती सावरू शकते.पण तेवढीही तसदी हल्ली कुणी घेत नाही.जर आपल्यामुळे कोणाचे भले होत असेल,एखाद्याचा आत्मविश्वास वाढत असेल तर तेथे नेहमीच मदत करायला सज्ज असले पाहिजे.
अन्न, वस्त्र, निवारा या जरी माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी यांच्यापेक्षाही काही गोष्टी आहेत ज्या माणसाला समाजाशी बांधून ठेवतात.त्यातली एक गोष्ट म्हणजे माणुसकी.माणुसकी फक्त माणसांपुरती मर्यादित नाही.माणुसकी प्राण्यांप्रती, निसर्गाप्रती सुध्दा असायला हवी.चला तर माणुसकी जपूया!

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleनांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी बुथ कमिटी ची बैठक- आ. हंबर्डे
Next articleमहाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here