Home परभणी रिमझिम पावसात दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर

रिमझिम पावसात दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर

349
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0043.jpg

रिमझिम पावसात दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी) जिंतूर:- एकादशीच्या पूर्वसंध्येलाच जिंतूर शहरातील बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पोशाख परिधान करून टाळ व मृदंगाच्या गजरात विठ्ठलाची दिंडी शहरातून काढली. यामुळे शहरात भक्तिमय वातावरण पाहण्यास मिळाले.
विठ्ठल आणि रुक्मिणीचा वेश, वारकऱ्यांचा गणवेश परिधान करून हातात टाळ आणि मृदंग, नऊवारी पातळ परिधान करून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन निघालेल्या मुली आणि भजनांचा गजर करत शहरातील मुख्य रस्त्यावरून शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. विठ्ठल माझा, माझा, माझा असे भक्तिमय अभंग सादर केले. “सांग, सांग रुक्मिणी, सांग तुझ्या विठ्ठलाला. तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला”. यासारखी भजने शाळेतील विद्यार्थ्यांनी गायली. विठ्ठल विठ्ठल – जनाबाईच्या गवाऱ्या बोलू लागल्या, कबीर अन् नामदेवाच्या माना डोलू लागल्या.
यासारखे अभंग रस्त्याने विद्यार्थ्यांनी सादर केले. थांबा जरा येऊ द्या मला, परसी भरायची आणि पंढरीची वारी मला करायची यासारखे अभंग सादर करत दिंडी शहराच्या मुख्य रस्त्यावरून शिवाजी चौक, येलदरी रोड पासून विठ्ठल मंदिरापर्यंत गेली. भरपावसात विद्यार्थ्यांच्या भक्तीचा नाद दुमदुमत होता. शाळेतील शिक्षकांनीही वारकऱ्यांचे गण वेश परिधान करून विद्यार्थ्यांच्या आनंदात अधिकच भर घातली. शाळेचे सचिव रमन तोष्णीवाल, मुख्याध्यापक गजानन तिखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला.काही ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला. तर याच दिंडीत साठ वर्षाच्या एका आजीबाईने अभंगाला दात देत दिंडीत सहभाग घेतला. सुभाष धानोरकर यांनी अभंग गाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. रामप्रसाद राखे, ज्ञानबा तडस, संजय साबळे, वसंत राठोड, प्रसाद घुगे, शिवाजी काकडे, विनोद पाचविल्ले, सुभाष चोपडे, परसराम घांदारे, गणेश रुघे, जी. एस. अंभोरे, अनिता मनोरवार, पद्मा जाधव, विजया पतंगे, बसवेश्वर स्वामी, संध्या पटोदे आदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

Previous articleपंढरी नगरी भक्तांचा महापूर
Next articleपालक सचिवांनी घेतली VC द्वारे आढावा बैठक. तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीला तहसीलदारासह तीनही ठाणे प्रमुखाची उपस्थिती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here