Home नांदेड नायगाव तहसीलवर दिव्यांग, वृध्द, निराधार,शेतमजुर,यांचा मोर्चाने परिसर दणानला -चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर

नायगाव तहसीलवर दिव्यांग, वृध्द, निराधार,शेतमजुर,यांचा मोर्चाने परिसर दणानला -चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0013.jpg

नायगाव तहसीलवर दिव्यांग, वृध्द, निराधार,शेतमजुर,यांचा मोर्चाने परिसर दणानला -चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिव्यांग,वृध्द,निराधार,गायरान पट्टेधारक,शेतमजुर, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट अखिल भारतीय किसान मजदुर सभा यांच्या वतीने भव्य मोर्चा २१ जुलै २०२२ रोजी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,केंद्रिय सचिव अशोक घायाळे यांच्या नेत्रत्वाखाली हजारोच्या संख्येनी खालील मागन्यासाठी घोषनानी परीसर दणानला व मा.मुख्यमंत्री महोदय यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
खालील प्रमुख मागन्या
१) या राज्यातील दिव्यांग,वृध्द निराधाराना आधार कोनाचा व ते कोणतेही काम करू शकत नाही अशाना दरमहा एक हजार मिळनारे अनुदान चार ते पाच महिने दिले जात नाही,व त्या अनुदानात दोन वेळेचा चहा साठी दुध तरी मिळत नाही? तेही चालु असलेल्या लाभधारकाना दरवर्षी
कुंटुबाचे एकविस हजाराचे ऊत्पन्नाचे,ह्यात प्रमाणपत्र आदी कागदपत्र सादर करण्याचे
आदेश दिले,दिव्यांग,वृध्द,
निराधाराना ऊत्पनाची अट रद्द करा जसे राज्यातील मंत्री, आमदारान लाखो रू उत्पन्न असताना त्यांना कोणतीही अट का नाही? दिव्यांग,वृध्द,निराधार दरमहा हजार रुपयासाठी तिजोरीत पैसे नसल्यामुळे चार ते पाच महिने पैसे मिळत नाहीत.
लोकप्रतिनिधीना वेतनासाठी राज्यावर हजारो कोटी रुपये कर्ज असताना साठ हजार कोटी रूपयाचे कर्ज घेऊन त्यातील तिस कोटी रूपये माजीमंत्री, आमदार यांच्या निवृतीवेतनाच्या पेशंन विधेयकाला मंजुरी दिली जाते दिनदुबळ्याना मानधनात वाढ का होत नाही?
२) महाराष्ट् अतिवृष्टीने सतर टक्के नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या
३)तेलगना राज्याप्रमाणे खरीप व रब्बी हंगामासाठी हेक्टरी तिस हजार रू अनुदान द्या,
४) रास्त दुकान,व दिव्यांग,वृध्द,निराधाराचे अंगठा येत नसल्याने राशन,व अनुदान उचल करता येत नसल्यामुळे व्हिडीओ,तथा बायोमेट्टिक ने पुरवठा करा.
५) दिव्यांग कायदा २०१६ ची कठोर अंमलबजावणी करा
६) दपत्रर दिंरगाई कायद्याप्रमाणे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करा
७) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका,पंचायत समिती,जिल्हापरीषद यांचा दिव्यांग पाच टक्के निधी न देणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करा
आदी मागन्यासाठी नायगाव तालुक्यातील दिव्यांग, वृध्द, निराधार,गायरान,पट्टेधारक
शेतमजुर यांचा मोर्चा तहसील कार्यालय नायगाव येथे घोषनेने परिसर दणानला.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पोटफोडे,चंपतराव डाकोरे पाटिल,विठल बेलकर, अशोक घायाळे, मानेजी पाटिल,गुंडाजी बोयाळसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दि पत्रक जि.संपर्क नागोराव बंडे, यांनी दिले.

Previous articleसरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व ?
Next articleनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here