Home भंडारा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा मंच युवकांना भरारी देणारा नाट्यगृहासाठी जागा शोधा, पैसा मी...

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा मंच युवकांना भरारी देणारा नाट्यगृहासाठी जागा शोधा, पैसा मी देतो : उपमुख्यमंत्री फडणवीस

43
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231008-WA0057.jpg

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा मंच युवकांना भरारी देणारा

नाट्यगृहासाठी जागा शोधा, पैसा मी देतो : उपमुख्यमंत्री फडणवीस

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) देशाच्या विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वच क्षेत्रात विकास साधला जात असताना युवा पिढीचा वाटा दुर्लक्षित करून चालणार नाही. आज भारत बदलत असताना, बदलत्या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना खासदार महोत्सवाचा हा मंच उंच भरारी घेण्यासाठी पोषक असा आहे. ग्रामीण भागात असलेल्या कलावंतांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. साकोली येथे नवीन नाट्यगृह तयार करण्यासाठी शासन पैसा देईल, जिल्हाधिकाऱ्यांनी जागा शोधावी असे राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साकोली येथे जाहिररित्या सांगितले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून, खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन आज साकोली येथील परेड ग्राउंड वर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
मागील महिनाभरापासून भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील सर्व तालुका स्तरावर युवक, युवती आणि महिलांच्या समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. पारंपरिक लोकनृत्याचाही समावेश यात होता. तालुकास्तरावर विजेत्या संघांसाठी लोकसभा स्तरीय स्पर्धा आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोपीय सोहळा 7 व 8 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर आ.विजय रहांगडाले, माजी आ. परिनय फुके, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, गोंदिया चे जिल्हाध्यक्ष उपराडे, संजय पूराम, डॉ. हेमकृष कापगते, संजय भेंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल, नाना पंचबुद्धे, सोमदत्त करंजेकर, प्रदीप पडोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले, निशिकांत इलमे, मनीष कापगते, ओम कटरे उपस्थित होते.
दीप प्रज्वलन झाल्यानंतर तालुका स्तरावर विजेत्या पहिल्या क्रमांकाच्या संघांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. तर अनुसूचित जमाती समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कारही यावेळी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्व. बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठानच्या शुभांगी मेंढे यांनी केले. आमच्या जिल्ह्यातील कलावतांच्या गुणांना वाव देण्यासाठी शासनाने त्याच्या पाठीशी राहावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मार्गदर्शन करताना खा. सुनील मेंढे यांनी सांस्कृतिक महोत्सवातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रतिभा शहरात पोहचली असे सांगितले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साधला जात असलेला विकास सर्वश्रुत आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वात महाराष्ट्राने घडविलेला बदलही तेवढाच उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी साकोली सांस्कृतिक नाट्यगृह मंजूर करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी उपस्थित यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी संस्कृती आणि तरुणाईला मोठा मंच मिळावा म्हणून खासदार महोत्सवाचा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे. भंडारा गोंदिया हे कलेचे माहेरघर आहे. जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. झाडीबोलीतील नाटके आपले वेगळे महत्त्व जपून आहेत. खडीगंमत, दंडार आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मंडई केवळ मनोरंजनच नाही तर समाज बांधण्याचे काम करीत असल्याचे यावेळी म्हणाले. आमच्या जिल्ह्यातील आदिवासी नृत्य विदेशातही आपला वेगळा ठसा उमटवू शकते. मात्र या तरुणाईला योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची गरज आहे. यशस्वी पंतप्रधानांच्या नेतृत्वात विकास साधला जात आहे. त्यात युवा पिढीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अशावेळी पुढे जात असलेल्या आणि बदलत्या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना खासदार युवा महोत्सव नवसंजीवनी देणारा ठरेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या मागणीला दुजोरा देत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यानच जिल्हाधिकाऱ्यांना जागा तुम्ही शोधा पैसा मी देतो असे सांगून खासदार सुनील मेंढे यांची मागणी मार्गी लावली. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.
कार्यक्रमाला सकाळ पासून सुरुवात झाली होती. दोन्ही जिल्ह्यातील अनेक संघाचे सादरीकरण दिवसभरात झाले आणि त्यांनी प्रेक्षकांची दादही मिळवली. यावेळी मुंबई येथून आलेल्या ब्रिटन गॉट टॅलेंट च्या एक्स वन एक्सच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

चौकटीची बातमी
उपमुख्यमंत्र्यांनी घेतला नृत्याचा आनंद

कार्यक्रमाला आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम स्थळी सुरू असलेल्या आदिवासी नृत्याचा आनंद घेतला आणि भरभरून दाद दिली.

Previous articleरुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा द्याव्यात :-जिल्हाधिकारी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे भेट व पाहणी
Next articleअमरावतीहुन मुंबईला तस्करी होणार १०८ किलो गांजा जप्त. सीपीच्या सीआय यु ची कारवाई.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here