Home अमरावती अमरावतीहुन मुंबईला तस्करी होणार १०८ किलो गांजा जप्त. सीपीच्या सीआय यु ची...

अमरावतीहुन मुंबईला तस्करी होणार १०८ किलो गांजा जप्त. सीपीच्या सीआय यु ची कारवाई.

26
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231008-WA0005.jpg

अमरावतीहुन मुंबईला तस्करी होणार १०८ किलो गांजा जप्त. सीपीच्या सीआय यु ची कारवाई.
——————————-
युवा मराठा वृत्तसेवा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या सी आय यु पथकाने एका कारमधून २१.६० लाख रुपये किमतीचा तब्बल १०८ किलो गांजा जप्त केला. गुन्ह्यात वापरलेले कार देखील जप्त करण्यात आली. अमरावती ते बडनेरा जुना बायपास मार्ग मार्गावर बगीया टी पाईंट जवळ कारवाई करण्यात ऑक्टोंबर रोजी रात्री ११.३०च्या सुमारास केलेल्या या कारवाई दरम्यान एकाला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी फरार झाला. रवी प्रेमचंद मारोडकर वय४०रा. नांदगाव खंडेश्वर असे अटक आरोपीचे नाव आहे. अमरावती बडनेरा शहरात तो गांजा मुंबई जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रात्रीच्या वेळेस११.३० सुमारास सीआययु पथकाचे प्रमुख तथा साहेब पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे व पीएसआय गजानन राजमल्लू यांना अमरावती ते बडनेरा जुना बायपास मार्गावर एक कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली त्यांनी पथकाच्या मदतीने जुना बायपास वर सापळा रचला असता रात्री १२ च्या सुमारास एक पांढरा रंगाची क्रमांक एम एच ०२ डीजी२०११ कार बगीया टी पाँइंट जवळ आली. पोलिसांनी कालचा पाठलाग करून पाहणी केली असता त्यामध्ये मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात गांजा ठेवलेला दिसून आला. कारचालक रवी मरोडकर याला सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. तो गांजा अमरावती होऊन मुंबईला घेऊन जात असल्याची पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्या गाडीवर मागे व पुढे प्रेस लीहलेले आढळले. त्या प्रकरणात दोन आरोपी असून एक आरोपीस अटक करून दुसऱ्या आरोपी फरार झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे त्यांच्यानुसार गांजा जप्ती प्रकरणात एकूण दोन आरोपी निष्पन्न झाले त्यातील एकाला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी फरार असल्याचे ते म्हणाले दरम्यान आरोपी फार चालकाने तो गांजा येथून कुठून भरला, तो कोणाचा, मुंबईचा गांजा रिसिव्हर कोण, अशा विविध प्रश्नांचा वेगळा पोलीस कोठडी दरम्यान होण्याची शक्यता आहे. येथून मुंबईला गांजाची खेप झाल्या पाठवणारा तस्कर कोण आहे त्याचा तपास पोलीस करणार आहेत. जप्त गांजाची किंमत २१लाख६०हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिसात आरोपी विरुद्ध एन डी पी एस कलमान्वे गुन्हा दाखल झाला आहे. काही काळुबाई विशेष पक्षातील अंमलदार सुनील लासुरकर, विनय मोहड, जाहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेगेकर, काटकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here