Home नाशिक वनसगांव विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचन प्रेरणा प्रकल्पातून...

वनसगांव विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचन प्रेरणा प्रकल्पातून अभिवादन….

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_064321.jpg

वनसगांव विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचन प्रेरणा प्रकल्पातून अभिवादन….

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वनसगांव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी महामानव‌‌ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. बाबासाहेब दररोज १८ तास अभ्यास करत असत.आजच्या काळात वाचनाची गरज लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अधिकाधिक रूची‌ निर्माण व्हावी या उद्देशाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘वाचन प्रेरणा प्रकल्प’ राबवून विद्यालयाने अनोखी आदरांजली अर्पण केली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक के.बी.दरेकर व सेवकवृंद,विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले.तदनंतर प्रत्येक विद्यार्थ्याने क्रमिक पुस्तकाव्यतिरिक्त एक पुस्तक वाचून पूर्ण केले.वाचन केलेल्या पुस्तकाचा दिलेल्या मुद्द्यांनुसार विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अहवाल लिहून पूर्ण केला.उपक्रमाचे नियोजन प्राचार्य सी.डी.रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपक गायकवाड व ग्रंथालय विभाग प्रमुख मनीराम महाले यांनी केले.
याप्रसंगी कु.तन्वी शिंदे,कार्तिक नितनवरे ,कु.संस्कृती शिंदे यांनी वाचलेल्या पुस्तकाचा अहवाल सादर केला.कु.धनश्री जावळे व कु.ईश्वरी कापडी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून पर्यवेक्षक के.बी.दरेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केलेली विद्वत्ता व समाजाप्रती केलेले अतुलनीय कार्य याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.उमा चव्हाण यांनी आभार मानले. कलाशिक्षक आनंदा आहिरे यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here