Home Breaking News पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

96
0

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. २४- नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंदर्भात आज आढावा घेतला.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, आ.माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज अहिरे, जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, डॉ.राहुल आहेर व अधिकारी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.

गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काही ठिकाणी पाणी वळविण्यसाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान प्रकल्प तात्काळ पूर्णत्वास नेले जातील.

नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वगळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दिंडोरी व कळवण मतदारसंघातील प्रकल्पांच्या कामासाठी लवकरच प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देण्याचा मनोदय आहे.

Previous article🛑 भारतीय जनता पार्टी, कोथरूड मतदार संघ महिला मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ 🛑
Next articleपुणे. ❌ भयनगरी पुणे❌
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here