Home मुंबई भारतरत्न ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान...

भारतरत्न ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_063755.jpg

भारतरत्न ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन

 

मुंबई (संजीव भांबोरे )भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागील अ ११ वर्षापासून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आजच्या युगातील सोशल मिडिया ग्रुप च्या द्वारे मुंबई मधील सेवाभावी संस्था, बचत गट या संत गाडगेबाबा स्वछता अभियान अंतर्गत चैत्याभूमी व शिवाजी पार्क आसपास परिसर स्वछता करून सेवा हिच श्रद्धांजली समजून आपले श्रमदान पार पाडत असतात .सर्व सामाजिक मंडळ, सामाजिक संस्था व बचत गट व सहभागी सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानण्यात येते .या अभियानास विशेष सहकार्य सहाय्यक आयुक्त व घन कचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी वर्ग जी/उत्तर बृहन्मुंबई महानगर पालिका दादर (प) मुंबई-२८. सहभागी संस्था व कार्यकर्ते. यंग बॉईज भिम मंडळ, खार. फ्रेंड्स ग्रुप (आंबेवाडी) सांताक्रूझ. बाल मित्र मंडळ, नायगाव. धम्मरत्न सामाजिक संस्था (रजि) दादर. समाधान महिला बचत गट. निलेश कदम, मंगेश येवले, यश विलणकर, संतोष शिंदे, ओमकार गुरव, नील कोठारी, संतोष राठोड, साहिल पानगळे. श्री जितेंद्र कांबळे.(उपाध्यक्ष वडाळा विधानसभा) सह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here