Home Breaking News माधुरी दीक्षित वाढदिवस विशेष : ….तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसोबत झाले असते...

माधुरी दीक्षित वाढदिवस विशेष : ….तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसोबत झाले असते माधुरीचे लग्न

261
0

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नव्वदच्या दशकामध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन असणारी अभिनेत्री म्हणजे आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. माधुरी हिचा आज 53 वा वाढदिवस. 15 मे 1967 ही तिची जन्मतारीख. आज माधुरी ड़ॉ. नेने यांच्यासोबत सुखी संसारात गुंतली असली तरी एके काळी टीम इंडियाच्या खेळाडूवर तिचा जीव जडला होता.या खेळाडूचे नाव आहे अजय जडेजा.

बॉलिवूडमध्येही माधुरीचे चाहते आहेत. संजय दत्त आणि अनिल कपूर सारख्या अभिनेत्यांसोबतही तिचे नाव जोडले गेले. परंतु माधुरीचे ह्रदय मात्र क्रिकेटच्या मैदानावर षटकार खेचणाऱ्या जडेजाने जिंकले होते. त्या काळी माधुरी आणि जडेजाच्या लव्ह स्टोरीचे किस्से सर्वत्र ऐकले जात होते.या दोघांची पहिली भेट एका मॅकझीनच्या फोटोशूट दरम्यान झाली होती. पहिल्या भेटीपासूनच दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा सुरू झाली होती. त्याकाळी हँडसम अजय जडेजाचेही लाखो दिवाने होते आणि मुली त्याच्यावर फिदा असायच्या. माधुरीसोबत नाव जोडले गेल्यानंतर तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशीही चर्चा सुरू झाली. काही चित्रपटांमध्ये त्याने कामही केले.माधुरी आणि जडेजा लग्न करणार अशाची चर्चा सुरू झाल्या, परंतु याच दरम्यान जडेजाचा फॉर्म हरवला आणि तो मैदानावर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. माधुरीमुळे जडेजाचे क्रिकेटवरून लक्ष उडाल्याची कुरबूर घरात सुरू झाली.जडेजा हा एका रॉयल कुटुंबातील होता तर माधुरी तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबात मोडत होती आणि याचमुळे माधुरीला जडेजा कुटुंबाचा नकार होता. त्यामुळे जडेजाने माधुरीपासून लांब राहणे पसंद केले. यानंतर माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला तर जडेजाने जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली हिच्याशी विवाह केला.

Previous articleशरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करा :
Next articleलॉकडाऊनमध्येही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here