Home Breaking News शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करा...

शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करा :

116
0

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलं आहे.
मागील तीन वर्ष सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत आहेत.यंदा कोरोनाच्या संकटामुळे साखर उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीतून कारखान्यांना बाहेर काढावं अशी मागणी शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

शरद पवारांनी आपल्या पत्रात पंतप्रधानांकडे खालील मागण्या केल्या आहेत.
साखरेची किमान विक्री किंमत सध्या ३१०० रुपये आहे त्यात वाढ करून ३४५० ते ३७५० पर्यंत ग्रेड प्रमाणे वाढवून द्यावी
– मागील दोन वर्षात जेवढ्या ऊसाचं गाळप झालंय, त्या ऊसाला एक टन ऊसामागे ६५० रुपये अनुदान
– केंद्र सरकारकडून दिलं जाणारं निर्यात प्रोत्साहन अनुदान मागील दोन वर्षांचं केंद्राकडे प्रलंबित आहे, ते तात्काळ देण्यात यावं
– साखरेचा साठा करण्यासाठी देण्यात येणारा दोन वर्षांचा खर्च केंद्राकडून मिळाला नाही, ते देण्यात यावे
– साखर कारखान्यांवरील कर्जाचे १० वर्षांकरता पुनर्गठन करावं
– इथनॉलच्या उत्पादनासाठी डिस्टलरी सुरू करायला बँकांकडून कर्ज मिळावं

अशा मागण्या शरद पवारांनी या पत्रात केल्या आहेत. साखर उद्योगावर देशातील ५ कोटींपेक्षा जास्त शेतकरी अवलंबून आहेत. मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात झाालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील साखऱ उद्योग अडचणीत आला होता. यंदा देशभर कोरोनाचं संकट साखऱ उद्योगावर घोंघावत आहे.

Previous articleप्रविण दटके यांच्या विरोधात ऍड.सतिश उके यांनी केली आयोगाकडे तक्रार
Next articleमाधुरी दीक्षित वाढदिवस विशेष : ….तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसोबत झाले असते माधुरीचे लग्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here