Home भंडारा तळा ज्युनियर कॉलेज इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ संपन्न

तळा ज्युनियर कॉलेज इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ संपन्न

16
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_075747.jpg

तळा ज्युनियर कॉलेज इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ संपन्न

तळे( संजीव भांबोरे )विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला – वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ 17 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री पुरूषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेशशेठ देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नानासाहेब यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्तिक पाटील, समिता शहापूरकर, मकरंद दलाल, मयुरी देवकर, सायली शिंगाडे, मयुरी साळवी या विध्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक भुरे टी एन व प्राध्यापक पाटील एन सी यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरूषोत्तम मुळे यांनी 12 वी नंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत कोणत्या संधी आहेत? या विषयावर मार्गदर्शन केले. सचिव श्री मंगेशशेठ देशमुख यांनी स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत या तीन गोष्टींचा अवलंब करावा असे आवाहन केले. शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे यांनी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग पाच वेळा बोर्डात प्रथम क्रमांकाचा निकाल लागला असून विध्यार्थ्यांना भविष्य घडवायचं असेल तर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे प्रतिपादन केले. प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख यांनी उद्याचे नागरिक म्हणून तुम्ही बाहेर पडणार आहात हा देश सक्षम करण्यासाठी तुम्ही परिश्रम करावे असे सांगितले. कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर यांनी विद्यार्थ्यानी आपले करियर योग्य रितीने घडवून आई- बाबा, शिक्षक व संस्थेचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नानासाहेब यादव यांनी 12 वी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी 12 वी बोर्ड परीक्षेच्या सूचना देऊन तुम्ही उंच शिखरावर पोहचा असा सल्ला दिला. तसेच शिक्षक व मान्यवरांनी इयत्ता 12 वी च्या विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही बी तर आभार प्राध्यापक मचे एन टी यांनी मानले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleवरवट बकाल व्यापारी संघटनेची शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleमाता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here