• Home
  • देगलूर शहरातील नागरिकांना देगलूर नगर परिषदेकडून जाहीर आवाहन..

देगलूर शहरातील नागरिकांना देगलूर नगर परिषदेकडून जाहीर आवाहन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210101-WA0063.jpg

देगलूर शहरातील नागरिकांना देगलूर नगर परिषदेकडून जाहीर आवाहन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी देगलूर नगर परिषदेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. देगलूर शहरातील नवजात मुलींसाठी 21 हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करण्याचे नगर परिषदेकडून जाहीर केले आहे.स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मुलींच्या व महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर व सामाजिक संस्थाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून देगलूर नगर परिषदेने सुद्धा खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प केला आहे. देगलूर शहराच्या मतदार यादीमध्ये नावाचा समावेश असलेल्या महिलेसह प्रसूतीनंतर कन्यारत्न मुलगी झाल्यानंतर देगलूर नगर परिषदेकडून त्या मुलीच्या नावाने 21000 रुपये वयाच्या 18 वर्षापर्यंत फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभापासून 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पर्यंत एका दिवसासाठी ही योजना करण्यात येत आहे प्रसुतीनंतर खाजगी किंवा शासकीय रुग्णालयाचे स्त्री जातीचे जन्म प्रमाणपत्र दाखला बंधनकारक आहे.अधिक माहितीसाठी देगलूर नगर परिषद येथे संपर्क साधावा असे आवाहन देगलूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री मोगलाजी अण्णा शिरसेटवार वर इरलोड यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment