Home कोल्हापूर वडगांव मधील महालक्ष्मी क्रिडा व सांस्कृतिक मंडळावर पोलिसांची मोठी कारवाई

वडगांव मधील महालक्ष्मी क्रिडा व सांस्कृतिक मंडळावर पोलिसांची मोठी कारवाई

84
0

राजेंद्र पाटील राऊत

वडगांव मधील महालक्ष्मी क्रिडा व सांस्कृतिक मंडळावर पोलिसांची मोठी कारवाई

पेठ वडगांव मध्ये पोलिसांची बेधडक सर्वात मोठी जुगार अड्यावर कारवाई पेठ वडगांव येथील महालक्ष्मी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे आज ३१ डिसेंबर च्या दिवशी पोलिसांनी मोठा छापा टाकून जवळपास ३५ जणांना ताब्यात घेतले असून व त्यांच्या पैशांची मोजमाप रात्री उशीरा पर्यंत सुरू होती .त्याचबरोबर खेळणारऱ्या कडून मोबाईल व रोखरक्कमसह  १५ मोटरसायकली यावेळी जप्त करण्यात आल्या आहेत .
तसेच पत्ते खेळण्याचे साहीत्य टेबाल खुर्च्या , काँईन , पत्यांचे बाँक्स असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आत्ता पर्यंत ची वडगांव शहरातील ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्यामुळे शहरात सर्वत्र एकच चर्चेचा विषय बनला आहे.
व घटणास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. सद्या वडगांव पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी आय.पी.एस. अधिकारी डॉ. बी. धिरज कुमार यांनी ही कारवाई केली आहे. यांच्या सोबत वडगांव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नसिर खान , किशोर पवार (आर.पी.टि.सी.) , विकास घस्ते , रणवीर जाधव , जितेंद्र पाटील , नरसिंग कुंभार , अशोक जाधव , रामराव पाटील , अमरसिंह पावरा , इत्यादी पोलिस फौज फाट्यासह ही कारवाई करण्यात आली आहे .

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here