राजेंद्र पाटील राऊत
राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफी व ५ लाखाचा विमा
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व
पत्रकारांना टोल माफी , तसेच महामार्गावर प्रवास करत असताना मृत्यू आल्यास विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते , वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानी केली आहे.
सिंधूदुर्गजिल्ह्यातील आजी- माजी पत्रकारांचे शिष्टमंडळळाने केलेल्या मागणी वरून मंत्री गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आमदार ,खासदार , मंत्री यांच्याप्रमाणेच पत्रकार समाजासाठी झटत असतात तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्थंब म्हणून ओळखला जातो.
पत्रकारांना नेहमीच महामार्गावरून प्रवास करवा लागतो त्यामुळे महामार्गावरील टोलनाक्यावर टोल माफी मिळावी याकरीता सिंधूदुर्गमधील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेशा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गडकरी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पत्रकारांनी योग्य मागणी केली आहे हे पटवून दिल्यावर फक्त सिंधुदुर्रातील पत्रकारांनाच नाही तर राज्यातील सर्वत्र पत्रकारांना टोल माफीची घोषणा केली तसे आदेश काढण्याच्या सुचना देखील सचिवांना दिल्या आहे.तसेच महामार्गावर पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला पाच लाखाचा विमाकवच देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केली. हि सवलत सर्वच पत्रकारांना सरसकट देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले .
