• Home
  • ग्रामपंचायत निवडणूका जाहिर आचारसंहीता जाहीर १५ जानेवारीला मतदान

ग्रामपंचायत निवडणूका जाहिर आचारसंहीता जाहीर १५ जानेवारीला मतदान

राजेंद्र पाटील राऊत

20201202_092155-removebg-preview.png

ग्रामपंचायत निवडणूका जाहिर
आचारसंहीता जाहीर
१५ जानेवारीला मतदान
मुंबई (विजय पवार महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-एप्रिल ते जुन २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १हजार ५६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते,परंतु कोवीड १९ ची परिस्थिती उदभवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.त्यानंतर तो पुर्णपणे रद्द करण्यात आला होता.यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
राज्यातील १४ हजार २३४ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५जानेवारी२०२१ रोजी मतदान तर१८जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.त्यासाठी आजपासून आचारसंहीता लागू झाली आहे.राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी आज येथे ही घोषणा केली.
या निवडणूकीसाठी नामनिर्दशन पत्रे २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्विकारली जातील.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्दशन पत्रे स्विकारली जाणार नाहीत.त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल.नामनिर्दशन पत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यत मागे घेता येतील.व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल असे त्यांनी सांगितले

anews Banner

Leave A Comment