Home माझं गाव माझं गा-हाणं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य;* *शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेती-सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन करावे*

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य;* *शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेती-सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन करावे*

171
0

राजेंद्र पाटील राऊत

*पिण्याच्या पाण्याला प्राधान्य;*
*शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेती-सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन करावे*
*: पालकमंत्री छगन भुजबळ*
नाशिक, ११ डिसेंबर  (जिमाका वृत्तसेवा):
यंदा जिल्ह्यातील कालव्यांमध्ये मुबलक पाणीसाठी उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेवून पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उर्ध्व मध्यम प्रकल्पाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता व लाभ क्षेत्र विकास प्राधिकारणाच्या प्रशासक अलका अहिरराव, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांचेसह पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ज्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या रोटेशनची तत्काळ आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पहिले रोटेशन द्यायला हरकत नाही. तसेच ज्या ठिकाणी मागणी नाही अशा धरणांच्या लाभ क्षेत्रात पाण्याचे रोटेशन तुर्तास थांबून त्याचा उन्हाळ्यासाठी विचार करण्यात यावा. रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी मिळेल याबाबत सुक्ष्म नियोजन करावे. त्याचबरोबर लाभ क्षेत्राबाबत खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व पाणी वाटप संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच वेळोवेळी निर्णय घेण्यात यावेत, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

याबैठकीत गंगापूर प्रकल्पातील डावा व उजवा कालवा, उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील पालखेड, ओझरखेड प्रकल्प, चणकापूर प्रकल्पातंर्गत गिरणा कालवा, कडवा प्रकल्प यामधील उपलब्ध पाणीसाठा व त्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी डॉ. भारती पवार, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी भाऊसाहेब ढिकले, रामदास आवारे, दत्तात्रय संगमनरे यांनी पाणी वाटपाबाबत असलेल्या समस्यांवर पालकमंत्री श्री. भुजबळ यांचेसाबत चर्चा करण्यात आली.          युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक 

Previous articleग्रामपंचायत निवडणूका जाहिर आचारसंहीता जाहीर १५ जानेवारीला मतदान
Next articleशहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here