• Home
  • **पवारांच्या ताफ्यातील एका पोलीस कार चा असिडेंन्ट** ✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**पवारांच्या ताफ्यातील एका पोलीस कार चा असिडेंन्ट** ✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**पवारांच्या ताफ्यातील एका पोलीस कार चा असिडेंन्ट**
✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हा हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने शरद पवार निघाले होते. तेव्हा, पाठीमागील पोलीस व्हॅन (MH- 12 NU- 5881) ही अचानक उलटली. यामुळे यातील वाहनचालक आणि एक अधिकारी जखमी झाले.
दरम्यान, अपघात झाल्याने शरद पवार यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले आहे. लोणावळा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

anews Banner

Leave A Comment